Raj Thackeray On Toll : राज ठाकरेंचा पुन्हा टोलनाक्यांवरून खळखट्याक ? सिन्नरच्या तोडफोडीचे समर्थन !

MNS Toll plaza movement News : तो काही सगळीकडे टोलनाके फोडत फिरत नसल्याकडेही राज यांनी त्यांच्या स्टाइलने लक्ष वेधले
Raj Thackeray Amit Thjackeray
Raj Thackeray Amit ThjackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरेंचे वाहन अडविल्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलची तोडफोड केलेल्या घटनेचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी समर्थन केले. टोल भरूनही वाहन अडविल्यानेच तोडफोड झाली. तो काही सगळीकडे टोलनाके फोडत फिरत नसल्याकडेही राज यांनी त्यांच्या स्टाइलने लक्ष वेधले. (latest Marathi News)

Raj Thackeray Amit Thjackeray
Raj Thackeray Meet Avinash Jadhav: राज ठाकरे खास शिलेदाराच्या घरी; अविनाश जाधवांच्या तब्येतीची केली विचारपूस

राज्य सरकार, ठेकेदारांचे लाड पुरविणाऱ्या नेत्यांनाही राज यांनी खडसावले. टोलवसुलीची कामे एकाच लाडक्या ठेकेदाराला केली जातात, असा सवाल करीत राज यांनी सरकारला इशाराच दिला. राज यांच्या पवित्र्यामुळे टोलनाक्यावरची टोल वसुली पुन्हा मनसेच्या निशाण्यावर येऊ शकते आणि नव्या वादाला तोंड फुटण्याचीही भीती आहे.

Raj Thackeray Amit Thjackeray
टोलनाका प्रकरणावर 'राज' पुत्र Amit thackeray यांच उत्तर | MNS | Raj Thackeray | Sarkarnama

राज ठाकरे म्हणाले, "ज्या टोलनाक्यावर तोडफोड झाली, तिथे अमितची गाडी खूप वेळ थांबून राहिली होती. अमितच्या कारवर फास्टटॅगही लावलेला होता. तरीही त्याला थांबवून ठेवण्यात आलं. तो तिथल्या लोकांना सांगत होता की, मी टोल भरलेला आहे, तरी त्याला तिथे थांबवून ठेवण्यात आलं. यानंतर तिथे तोडफोड झाली. टोलनाक्यावरील माणूस उद्धटपणे बोलत होता. यामुळे कार्यकर्त्यांकडून स्वाभाविक प्रतिक्रिया आली आहे. "

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com