राजीव सातव;शांत स्वभावाचा दिलदार मित्र

शांत स्वभावाचा राजीव सातव हा तेवढाच दिलदार मित्र
satav.jpg
satav.jpg

पिंपरीः शांत स्वभावाचा राजीव सातव हा तेवढाच दिलदार मित्र आणि स्पष्टवक्ता होता.पक्ष संघटनेत मी त्याला सिनिअर होतो. तरीही मला डावलून त्याला प्रदेश युवकचे अध्यक्ष केल्यानंतर त्याने ही खंत माझे नाव घेऊन त्याच्या सत्काराच्या वेळी मुंबईत षण्मुखानंद हॉलमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांच्यासमोर व्यक्त करण्याचे धाडस केले होते, असे सातव यांच्याबरोबर पुण्यातील फर्ग्यूसन कॉलेजमध्ये पाच वर्षे बरोबर शिकलेले पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले.खा. सातव यांच्या अकाली निधनानंतर अशाच उत्स्फूर्त प्रतिक्रिया शहरातील इतरही व त्यातही युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.(Rajiv Satav, a kind friend with a calm disposition)

साठे आणि सातव हे महाविद्यालयात एकत्र होते. सातव प्रदेश युवक कॉंग्रेसचे सचिव असताना साठे प्रदेश उपाध्यक्ष होते. युवकमधूनच ते तालुका पंचायत समिती सदस्य झाले. सभापती व २००९ ला आमदार व त्यानंतर खासदारही झाले,असे साठे म्हणाले.चार महिन्यापूर्वीच त्यांची दिल्लीत भेट झाली होती. तर, गेल्यावर्षी वडिलांच्या निधनानंतर ते आवर्जून पिंपरी-चिंचवडला घरी आल्याची आठवण साठे यांनी सांगितले.

ताई,काही मदत लागली,तर सांगा,असं हक्काने बोलणाऱ्या सातवांचे निधन चटका लावून गेले,अशी प्रतिक्रिया महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे यांनी दिली. त्या प्रदेशाध्यक्षा असताना सातव युवकचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे ‌त्यावेळी त्यांच्या सतत संपर्कातून त्यांचा शांत व सयमी स्वभाव कळला होता,असे सोनवणे म्हणाल्या. एकमेकांना सहकार्य करणे, विचारपूस करणे.व‌ पक्षाशी एकनिष्ठ राहून काम‌ करणे या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांना दिलेली राष्ट्रीय युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याने व त्यांच्या एकनिष्ठ पक्षकार्यामुळे‌ ते राहूल‌ गांधींचा त्यांनी विश्‍वास संपादन केला होता. त्यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली‌आहे, असे सोनवणे यांनी सांगितले.

सातव यांच्या अकाली निधनाने काँग्रेस पक्षातील युवा पिढीचे अतोनात नुकसान झाले असल्याचे ‘एनएसयूआय’चे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे म्हणाले. सातव प्रदेशचे युवक अध्यक्ष असताना कांबळे एनएसयूआयचे अध्यक्ष होते. दिल्लीतील महाराष्ट्राच्या प्रत्येक कॉंग्रेस कार्यकर्त्याचे आपल्या हक्काचं ठिकाण सातव होते, असे ते म्हणाले. तर, महाराष्ट्राचा दिल्लीतील आवाज आज शांत झाला, अशी खंत विद्यार्थी कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेश सचिव अॅड. आतिश लांडगे यांनी व्यक्त केली. प्रदेश सचिव असताना सातव यांना पुणे सचिव म्हणून नियुक्तीचे पत्र दिल्याची आठवण त्यांनी सांगितली.नवतरुणांना त्यांच्या पडत्या काळात उभारी देण्याचे काम सातव यांनी केले.त्यामुळे त्यांच्या निधनाने युवक कॉंग्रेस पोरकी झाल्याची भावना पिंपरी-चिंचवड शहर युवक कॉंग्रेस सरचिटणीस मयूर कसबे यांनी व्यक्त केली.

Edited : By Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com