राज ठाकरेंना भाजपला सोबत घेणे परवडणारे नसून घेऊही नये...

RPI|Ramdas Athavale|Raj Thackeray|MNS|BJP : आरपीआय भाजप तथा एनडीएसोबत असल्याने राज ठाकरे यांची गरज नसल्याने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
Ramdas Athavale & Raj Thackeray
Ramdas Athavale & Raj Thackeray Sarkarnama

पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे हिंदुत्वाकडे झुकले असले, तरी त्यांची आम्हाला (NDA) आवश्यकता नाही. आमचा व त्यांचा अजेंडा वेगवेगळा आहे. तसेच त्यांचा एकच आमदार आहे. त्यांच्या सभेला गर्दी होत असली, तरी त्याचे रुपांतर त्यांना मतात करणे जमलेले नाही. म्हणून त्यांना घेणे भाजपला (BJP) परवडणारे नाही. कारण त्यात त्यांचा फायदा नाही,असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (RPI) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी आज (ता.३ एप्रिल) पिंपरी-चिंचवडमध्य़े (Pimpri-Chinchwad) मांडले.

Ramdas Athavale & Raj Thackeray
शरद पवार जातीवादी नाहीत मात्र त्याच्या पक्षात जातीवादी वृत्तीचे काही लोक दिसतात...

पक्षाच्या संकल्प मेळाव्यासाठी आज आठवले पिंपरीत आले होते. त्यापूर्वी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी राज ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसवरील टीकेसारख्या काही विधानांशी सहमती दर्शवली. मात्र, त्यांना भाजपमध्ये घेण्यास त्यांनी ठाम विरोध केला. आऱपीआय भाजप तथा एनडीएसोबत असल्याने राज यांची गरज नसल्याने त्यांनी सांगितले. त्यांना घेऊ नये,असे माझं मत आहे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. कारण आरपीआय बरोबर असल्याने भाजपचा मोठा फायदा होत आहे,याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Ramdas Athavale & Raj Thackeray
मशिदींसमोर भोंगे लावायवा अमित ठाकरेंना पाठवा; सुजात आंबेडकरांचे राज ठाकरेंना आव्हान

२०२४ ला पुन्हा भाजपच चारशे जागा मिळवून केंद्रात सत्तेत येईल,अशी भविष्य़वाणी आठवले यांनी यावेळी केली. राज्यात सुद्धा विधानसभा जिंकू, असाही दावा त्यांनी केला. भाजप हा मुस्लिमांच्या विरोधात आहे, हे चूक असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रातील भाजप सरकार हे धर्मांध असल्याचा आरोपही त्यांनी खोडून काढला. ते एका धर्माचे नाही,असे सांगताना ते हिंदूबरोबर मुस्लिमांसाठीही काम करतेय, असे ते म्हणाले. त्यामुळे भाजप हिंदूराष्ट्रासाठी काम करतेय, हे चुकीचे असून ती सर्वांसाठी काम करतेय,असे त्यांनी सांगितले. भाजपमध्ये अनेक मुस्लिम नेते आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com