Ramdas Athawale : '...हे ध्यानात असू द्या' म्हणत रामदास आठवलेंनी महायुतीलाच काढला चिमटा!

Baramati Lok Sabha Constituency : 'मला सुप्रिया सुळे यांचा आदर आहे, पण आता...' असंही जाहीर विधान आठवलेंनी केलं आहे.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : 'राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) असे तीन पक्षाचे सरकार आहे, असे तुम्ही सारखं म्हणता. पण आम्ही रिपब्किलन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) पण तुमच्यासोबत आहोत हे ध्यानात असू द्या.', असा चिमटा केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच काढला आहे.

दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बारामती लोकसभा मतदारसंघामधील महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना रामदास आठवले यांनी हा चिमटा काढला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह वासुदेव काळे, प्रदीप गारटकर, वैशाली नागवडे, प्रेमसुख कटारिया, सूर्यकांत वाघमारे, परशुराम वाडेकर, रवींद्र कांबळे, नागसेन धेंडे आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ramdas Athawale
Shirur Loksabha News : अमोल कोल्हेंना पाडण्यासाठीच 'राष्ट्रीय अध्यक्षांचा' रडीचा डाव : रोहित पवारांची टीका

रामदास आठवले(Ramdas Athawale) म्हणाले, विरोधक नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यघटना बदलतील, असा खोटा प्रचार करीत आहे. राज्यघटना बदलण्याचा प्रश्नच येत नाही आणि जो तसा प्रयत्न करेल त्याला आम्ही देशातून हाकलून लावू.'

याशिवाय 'केंद्रीय अर्थसंकल्पात माझ्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयासाठी 1 लाख 59 हजार कोटी रुपयांची तरतूद आहे, तर आदिवासी विकास मंत्रालयासाठी 1 लाख 33 हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. मला सुप्रिया सुळे यांचा आदर आहे, पण आता संसदेत बोलण्यासाठी समंजस लेक आणि सून असणाऱ्या सुनेत्रा अजित पवार यांना मतं देत दिल्लीत पाठवा.'

Ramdas Athawale
Amol Kolhe criticism of Narendra Modi : मग मतं मागायला महाराष्ट्रात..., कोल्हेंनी मोदींना सुनावले !

तर  अजित पवार म्हणाले, 'सूर्य व चंद्र आहे तोपर्यंत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना कोणी बदलू शकणार नाही. दहा वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरिता महायुतीच्या उमेदवारास विजयी करावे.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com