Pune News : रामदास ठाकुरांचा आमदारकीसाठी पुन्हा शड्डू : मोहितेंच्या 'त्या' विधानाने राष्ट्रवादीतील इच्छूक लागले कामाला

Dilip Mohite Patil Khed News : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची धामधूम आता पासूनच सुरु झाली आहे.
Dilip Mohite Patil
Dilip Mohite PatilSarkarnama

bullock cart race News : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची धामधूम आता पासूनच सुरु झाली आहे. तालुक्यात बैलगाडा स्पर्धेच्या निमित्ताने निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असल्याचे चित्र आहे. खेडमध्ये शर्यत जरी बैलगाड्याची असली तरी त्याला किनार मात्र, विधानसभा निवडणुकीची असल्याचे बोलले जात आहे. बैलगाड्याच्या घाटातून निशाणा विधानसभेवर असल्याचे दिसत आहे.

बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळाल्यापासून शेतकरी आणि गाडा शौकीनांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गावागावात बैलगाड्याच्या घाटात धुरळा उडत आहे. पुढील काळात येऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेऊन अनेकांनी बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून लोकांना गोंजारण्याचे काम सुरू केले आहे.

Dilip Mohite Patil
NCP Protest News: पुण्यातही 'आरे'सारखा मुद्दा पेटणार? झाडांच्या कत्तलीवरुन पालिकेविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

आजवर आपण कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी स्पर्धा पाहिली, त्यांनतर आता महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली. तर खेडमध्ये पंचायत समिती आणि बाजार समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर (Ramdas Thakur) यांनी तर बैलगाड्यांची महाराष्ट्र केसरी शर्यत ठेवली आहे. जरी त्यांच्याकडून आयोजन बैलगाडा स्पर्धेचे केले जात असले तरी या माध्यमातून त्यांची विधानसभेच्या रिंगणात पुन्हा एकदा उतरण्याची इच्छा लपून राहिलेली नाही.

खेड तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यात आणि शहरी भागात या शर्यतीच्या करण्यात आलेल्या जाहिरातीत रामदास ठाकूर यांनी शेजारी विधानभवनाचे चित्र छापले आहे. त्यामुळे त्यांची यातून आमदार होण्याची इच्छा स्पष्टपणे दिसत आहे.

रामदास ठाकूर यांनी यापूर्वी २००९ मध्ये विधानसभा लढविली होती. त्यात त्यांना अपयश आले होते. तरी अपक्ष असूनही त्यांनी ४० हजारांपेक्षा जास्त मतदान घेतली होती. यावेळी होणाऱ्या बैलगाडा शर्यतीला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान सभेचे उपसभापती नरहरी झिरवळ, माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आणि खासदार उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

Dilip Mohite Patil
Nilesh Lanke News : राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंनी उपसलं उपोषणाचं अस्र! शिंदे सरकारवर केले 'हे' गंभीर आरोप

खेडमध्ये मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांनी ही माझी शेवटची निवडणूक असेल, असे सांगितले होते. मोहिते यांच्या या घोषणेने स्वपक्षातील त्यांच्या नेत्यांसह विरोधकांना थोडेसे का होईना हायसे वाटले असेल. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यातूनच ठाकूर यांची इच्छा प्रकट झालेली दिसते आहे.

सध्या तालुक्यात आमदार मोहिते यांचा सुरू असणारा कामाचा धडाका आणि वेगवेगळ्या निवडणुकीत मिळत असलेले यश पाहता मोहिते यांचे कार्यकर्ते त्यांना निवडणूक लढविण्यापासून थांबवतील असे चित्र दिसत नाही. त्यामुळे पुढील काळात खेडचा आमदार होण्यासाठी सुरू असलेली स्पर्धा केवळ तालुक्यातच नाही तर राष्ट्रवादीत देखील पहायला मिळेल यात शंका नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com