Congress News : आढावा बैठकीत रमेश बागवे ज्यांच्यामुळे चिडले ते रशीद शेख आहेत तरी कोण ?

Pune Congress : पुणे काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचेही केले स्पष्ट
Rashid Shaikh, Ramesh Bagve
Rashid Shaikh, Ramesh BagveSarkarnama

प्राची कुलकर्णी

Ramesh Bagve Angree in Front of Nana Patole : मुंबईत काँग्रेसच्यावतीने राज्यातील लोकसभा मतदारसंघाबाबत आढावा बैठक नुकतीच पार पडली. त्यात पुणे लोकसभेचाही आढावा घेण्यात आला. यावेळी पुणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षश्रेष्ठींसमोरच उघडपणे नाराजी व्यक्त केली. पुणे शहर काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गटबाजीबाबत खंत व्यक्त केली.

बागवे यांनी पक्षश्रेष्ठींसमोरच थेटपणे आपली नाराजी व्यक्त केली. त्याबाबत एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुणे (Pune) शहरात चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी उघडपणे घेतलेल्या भूमिकेला २०१९ ची निवडणूक असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत बागवे यांचा सुमारे चार हजार मतांनी पराभव झाला होता. त्यासाठी ते काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे नगरसेवक रशीद शेख यांना जबाबदार धरतात.

Rashid Shaikh, Ramesh Bagve
Congress News : ज्यांनी पक्षाविरूद्ध काम केलं, त्यांच्या घरी नेतेमंडळी का जातात? रमेश बागवे बैठकीतच संतापले !

कोण आहेत रशीद शेख ?

रशीद शेख काँग्रेसचे माजी नगरसेवक होते. ते पुणे महानगरपालिकेच्या (PCM) स्थायी समितीचे माजी अध्यक्ष होते. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचा फटका बागवे यांना बसला. त्यानंतर कसबापेठ पोट निवडणुकीदरम्यान ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. या प्रवेशाबाबत बागवे यांना कल्पना देण्यात आली नाही. त्यामुळे बागवे नाराज आहेत.

बागवे यांच्या चिडण्याचे कारण

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी रशीद शेख, सुधीर जानजोत आणि सदानंद शेट्टी हे काँग्रेसचे तीन माजी नगरसेवक भाजपात दाखल झाले. रशीद शेख यांचा मुस्लिम समाजात चांगला प्रभाव आहे. त्याचा फटका रमेश बागवे (Ramesh Bagve) यांना २०१९ च्या निवडणुकीत झाला. या निवडणुकीत बागवे यांचा कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून सुमारे चार हजार मतांनी पराभव झाला. दरम्यान, शेख यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेतल्याने बागवे नाराज आहेत.

Rashid Shaikh, Ramesh Bagve
Abdul Sattar organize Shiv Mahapuran News : अब्दुल सत्तारांनाही शिवमहापुराण कथेची भूरळ, मतदारसंघात करणार आयोजन..

दरम्यान, बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे (Avinash Bagve) यांनीही शेख यांच्या प्रवेशाने नाराजी व्यक्त केली होती. ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी संपर्क साधून बागवे पिता-पुत्रांची नाराजी दूर केली. असे असले तरी बागवे यांना अद्यापही शेख यांचा काँग्रेसप्रवेश रुचलेला दिसत नाही.

Rashid Shaikh, Ramesh Bagve
Prithviraj Chavan News : ब्रिजभूषणवर कारवाईला मोदी सरकार घाबरतंय : पृथ्वीराज चव्हाण

आता आढावा बैठकीतही त्यांनी शेख यांच्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले,"ज्यांच्यामुळे पक्षाचा पराभव झाला त्यांच्याबरोबर काँग्रेसचे (Congress) कार्यकर्ते फिरतात. त्यांच्या घरी जाऊन बसतात. त्यामुळे पक्षात गटबाजी झाली आहे. यामुळे पक्ष वाढणार कसा? पक्षाविरोधात काम करणाऱ्यांमुळे आपले आमदार कसे निवडून येणार?"

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com