Ravindra Dhangekar : पाऊस झाला मोठा, नालेसफाई घोटाळा...; रवींद्र धंगेकर बरसले

Pune Rain : एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली. पुढच्या 50 वर्षांचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला आहे.
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama
Published on
Updated on

PMC News : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पुण्यातून मुरलीधर मोहोळ दिल्लीला गेले. निकालानंतर चार दिवसांनी झालेल्या पावसाने पुण्यात दाणादाण उडवून दिली. शहरात ठिकठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने पुणेकरांची अक्षरशः तारांबळ उडाली. यावरून आमदार रवींद्र धंगेकर सत्ताधाऱ्यांवर बरसले. त्यांनी महापालिकेत नालेसफाईत झालेल्या घोटाळ्यावरून सत्ताधाऱ्यांवर सडकून काढले. पाऊल झाला मोठा, नालेसफाई घोटाळा झाला खोटा, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोलाही लगावला.

पुण्यात शनिवारी दुपारनंतर धुवाँधार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी साचले होते. अनेक ठिकाणी वाहने पाण्यात बुडाली होती. सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे कोंडीत अडकलेल्या नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. या स्थितीवर धंगेकरांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

धंगेकर म्हणाले, आजच्या एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली आहे. सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे. आज प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जॅममध्ये अडकला आहे. पुढच्या 50 वर्षांचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला आहे. प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच आल्या आहेत, असे म्हणत धंगेकरांनी पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले.

या स्थितीवर सत्ताधाऱ्यांना विचारले तरी योग्य उत्तर मिळणार नाही, असेही धंगेकरांनी Ravindra Dhangekar पुणेकरांना सल्ला दिला. शहरात कितीही पाणी साचले तरी पुणेकरांनो तुम्ही कुणाला जाब विचारायचा भानगडीत पडू नका, कारण "पाऊसच जास्त झाला" असे त्यांचे नेहमीचे उत्तर ठरलेले आहे, अशी बोचरी टीकाही धंगेरकरांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com