Murlidhar Mohol: धंगेकर करणार मुख्यमंत्र्यांकडं तक्रार! मोहोळ फडणवीसांच्या भेटीला; नेमकी काय झाली चर्चा?

Murlidhar Mohol: पुण्यातील कथित जैन बोर्डिंग भूखंड विक्री घोटाळा तसंच महापौर असताना बिल्डरची कार वापरल्याचा आरोप पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर होत आहे.
Murlidhar Mohol: धंगेकर करणार मुख्यमंत्र्यांकडं तक्रार! मोहोळ फडणवीसांच्या भेटीला; नेमकी काय झाली चर्चा?
Published on
Updated on

Murlidhar Mohol: पुण्यातील कथित जैन बोर्डिंग भूखंड विक्री घोटाळा तसंच महापौर असताना बिल्डरची कार वापरल्याचा आरोप पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर होत आहे. शिवसेनेचे महागनर प्रमुख रविंद्र धंगेकर यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मोहोळ यांना टार्गेट केलं आहे. यामुळं महायुतीमध्ये देखील खळबळ माजली आहे. यापार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. साम टीव्ही न्यूजनं याबाबत बातमी दिली आहे.

Murlidhar Mohol: धंगेकर करणार मुख्यमंत्र्यांकडं तक्रार! मोहोळ फडणवीसांच्या भेटीला; नेमकी काय झाली चर्चा?
Jain Boarding Land Scam: पुण्यातील जैन बोर्डिंग भूखंड घोटाळा प्रकरणी खासदार मोहोळांची थेट PM मोदींकडे तक्रार!

कशासाठी भेट?

मुरलीधर मोहोळ यांच्यावर होत असलेल्या घोटाळ्यांच्या आरोपांबाबत आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडं तक्रार करणार असल्याचं धंगेकर यांनी म्हटलं आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये भेट झाल्याचं सामनं आपल्या सुत्रांच्या हवाल्यानं सांगितलं आहे. पण या भेटीमध्ये नेमकी कुठल्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण पुण्यात सध्या जो काही राजकीय आरोपांचा धुरळा उडाला आहे, तो खाली बसवण्यासाठीच ही भेट असल्याची चर्चा आहे.

Murlidhar Mohol: धंगेकर करणार मुख्यमंत्र्यांकडं तक्रार! मोहोळ फडणवीसांच्या भेटीला; नेमकी काय झाली चर्चा?
Dhangekar on Mohol: "महापौर असताना मोहोळ बिल्डरची कार वापरत होते"; धंगेकरांचे खासदारांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप

धंगेकरांवर शेलक्या शब्दांत टीका

दरम्यान, महायुतीतील मित्रपक्षांकडून जाणीवपूर्वक मुरलीधर मोहोळ यांना टार्गेट केलं जात आहे, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर पुण्यात पत्रकारांशी बोलताना मोहोळ म्हणाले, नाही मला यात राजकारण वाटत नाही. एक व्यक्ती यात गडबड आहे. फक्त एकच माणूस विकृत झाला आहे आणि तो पुण्यातील राजकीय संस्कृतीची वाट लावून टाकतो आहे. पण मी पुन्हा पुन्हा सांगतो की, व्यक्तीगत पातळीवर कुठपर्यंत जावं याची काहीतरी मर्यादा असते. पण रोज उठायचं आणि काहीतरी बोलायचं पुरावे असतील तर तुम्ही बोला. पण माझ्यावरील आरोपांचे मी पुरावे दाखवले. महापौरांच्या गाडीबाबतही मी तुम्हाला पुरावे दिले की पुण्याचा पहिला महापौर आहे की ज्यानं स्वतःची गाडी वापरली.

धंगेकरांचा आरोप काय?

रविंद्र धंगेकर यांनी महापौरांच्या गाडीबाबत आरोप केला की, मोहोळ हे महापौर असताना बढेकर बिल्डरची गाडी वापरत होते, हे नीतिमत्तेला धरून आहे का? असा प्रश्‍न विचारत त्यांचा जुना व्हिडिओही व्हायरल केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com