सरकारी कर्माचाऱ्याने लाच मागितल्यास 'हा' नंबर लक्षात ठेवा

Baramati Crime|bribe| बारामतीत लाच घेणारा पीएसआय एसीबीच्या जाळ्यात
Baramati Crime
Baramati Crimesarkarnama
Published on
Updated on

सरकारनामा ब्यूरो

बारामती : पुणे ग्रामीणमधील बारामती (Baramati) तालुका पोलिस ठाण्यावरील पोलिस उपनिरीक्षक (PSI) विलास अशोक थोत्रे (वय ३५) याला १५ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. पोलिस ठाण्यावर आलेल्या तक्रारीवर गुन्हा नोंदवून कारवाई न करण्यासाठी ऋषीकेश नंदकुमार पतंगे या आपल्या पंटरमार्फत धोत्रेने एका तरुणाकडून ही लाच घेतली होती.

लाच घेताना पकडला गेलेला पोलिस अधिकारी वा कर्मचारी याला पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश हे थेट घरचा रस्ता दाखवतात. म्हणजे त्याला निलंबित करतात. अशा कडक व धडक कारवाईची शस्त्रक्रिया आता पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक तथा एसपी डॉ. अभिनव देशमुख हे करणार का,याकडे लक्ष लागले आहे.

Baramati Crime
सोमय्या पिता-पुत्रांचा पाय खोलात! कधीही होऊ शकते अटक

दरम्यान,याबाबत धोत्रे कर्तव्यास असलेल्या बारामती पोलिस ठाण्यात त्याच्याचविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील फिर्यादी आणि पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केलेल्या तक्रारदार तरुणाविरुद्ध बारामती तालुका पोलिस ठाण्यात एक तक्रार देण्यात आली होती.त्यावर गुन्हा दाखल करून कारवाई न करण्याकरिता धोत्रेने पन्नास हजार रुपये मागितले. नंतर१५ हजार रुपयांवर तडजोड झाली होती.

मात्र,लाच द्यायची नसल्याने सदर तरुणाने एसीबीकडे तक्रार केली. तिची ९ तारखेला पडताळणी करून त्याच दिवशी ही यशस्वी सापळ्याची (ट्रॅप) कारवाई करण्यात आली. एसीबीच्या पोलिस निरीक्षक (पीआय) प्रणेता सांगोलकर पुढील तपास करीत आहेत.कुणा शासकीय कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास १०६४ या टोल फ्री क्रमाकांवर संपर्क साधा,असे आवाहन एसीबीच्या पुणे विभागाचे एसपी राजेश बनसोडे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com