Rohit Pawar News : मतदान केल्यानंतर रोहित पवारांचा अजितदादांवर मोठा आरोप; म्हणाले...

Baramati Lok Sabha Constituency : अजितदादांना आता वडीलधारी मंडळी कळत नाही. नाते कळत नाहीत. अजितदादांचा प्रचार माझ्या आजोबांनीही केलेला आहे. आणि नात्यांबद्दल माझ्या छोट्या मुलांना समजते आणि 65 वर्षांच्या माणसाला हे कळत नाही.
Rohit Pawar voting with Family at Pimpli
Rohit Pawar voting with Family at PimpliSarkarnama

Baramati Political News : मतदानाच्या आदल्या दिवशी सर्व ठिकाणी धनशक्तीचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भोरमध्ये फोडलेल्या गाडीत पैसे सापडले. बारामतीत कधी नाही इतके पैसे वाटल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केला.

तसेच अनेक नागरिकांनी पैसे नाकारल्याचे सांगत ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवारांनी ही लढाई विचारधारेची असल्याचे सांगितले आहे.

बारामती तालुक्यातील पिंपळी येथे आमदार रोहित पवारांनी मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत वडील राजेंद्र पवार, आई सुनंदा पवार, पत्नी कुंती पवार व बहिण सई पवार उपस्थित होत्या. मतदानानंतर रोहित पवारांनी माध्यमांची संवाद साधला.

ते म्हणाले, सर्व सामान्य नागरिकांसाठी पीडीसीसी बँक ही 5 वाजता बंद होते. मात्र यांच्यासाठी रात्री एक एक वाजेपर्यंत बँक सुरू राहते. तसेच कर्मचारी देखील यात सहभाग घेतात. हे खूप वाईट आहे.

राज्य सरकारने ज्यांना कुणाला वाय प्लस सुरक्षा दिली आहे, ती यासाठीच दिली आहे. भोरमध्ये हे पैशांचे वाटप झाले ते मावळचे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते होते. तसेच जे साखर कारखाने अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात, त्या कारखान्यांचे प्रतिनिधी देखील यावेळी पाहायला मिळाले, असा आरोप रोहित पवारांनी यावेळी केला.

Rohit Pawar voting with Family at Pimpli
Kolhe Vs Adhalrao: आढळरावांना नाटकं जमत नाहीत, मात्र धंदा चोख जमतो; कोल्हेंचे उत्तर

गिरीश महाजनांचा अहंकार अजितदादांमध्ये आला आहे, अशी टीकाही रोहित पवारांनी केली. ते म्हणाले, अजितदादांना आता वडीलधारी मंडळी कळत नाही. नाते कळत नाहीत. अजितदादांचा प्रचार माझ्या आजोबांनीही केलेला आहे. आणि नात्यांबद्दल माझ्या छोट्या मुलांना समजते आणि 65 वर्षांच्या माणसाला हे कळत नाही. फक्त स्वतःच साम्राज्य वाचवण्यासाठी इतरांसोबत जायचे, असा टोलाही त्यांनी लगावला.

ही विचारधारेची लढाई : श्रीनिवास पवार

आम्ही पहिल्यापासूनच काँग्रेसच्या विचारधारेचे आहोत. त्याच विचारधारेने आम्ही चालणार. अजित पवारही याच विचारधारेचे होते, मात्र त्यांनी स्वतःची विचारधारा बदलली. ही विचारधारेची लढाई आहे. कौटुंबिक पातळीवर ही लढाई नाही.

मी कधीही राजकारणात नव्हतो आणि नसणार आहे, असे श्रीनिवास पवारांनी मतदानानंतर सांगितले. बारामती लोकसभेसाठी काटेवाडी येथे श्रीनिवास पवार, शर्मिला पवार व युगेंद्र पवार यांनी मतदान केले.

(Edited by Sunil Dhumal)

Rohit Pawar voting with Family at Pimpli
Lok Sabha Election 2024 Voting LIVE: पवार कुटुंबाने एकटं पाडलं? अजित पवार यांचा 'दीवार टच'; 'मेरे पास मेरी माँ है..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com