Rohit Pawar News: कांदा अनुदानावरुन रोहित पवारांनी सरकारला फटकारले; शेतकऱ्यांसाठीचा कळवळा केवळ भाषणांतूनच का....

Onion Subsidy News: कांदा अनुदान देताना सरकारने आखडता हात घेतला आहे. यावरुन कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्टीट करत सरकारला खडसावले आहे.
Eknath Shinde, Rohit Pawar
Eknath Shinde, Rohit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Onion Farmers News: कांदा अनुदानासाठी तरतूद करूनही पाच महिने उलटले तरी शेतकऱ्यांना अनुदानाचा एक रुपयाही मिळलेला नाही. आता निधीअभावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त केवळ १० हजार रूपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे सरकार बंडखोर आमदारांच्या संरक्षणाला १५० कोटी देते, नाराज आमदारांना दीडशे-दीडशे कोटीची खिरापत वाटते. पण, शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. शेतकरी हिताच्या गोष्टी, शेतकऱ्यांसाठीचा कळवळा केवळ भाषणांतूनच दाखवणार का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

कांदा अनुदान Onion Subsidy देताना सरकारने आता आखडता हात घेतला आहे. केवळ निधी अभावी शेतकऱ्यांना टप्प्याटप्याने अनुदान मिळणार असल्याचे दिसत आहे. यावरुन कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी व्टीट करत सरकारला खडसावले आहे.

Eknath Shinde, Rohit Pawar
Chhagan Bhujbal On Onion : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी छगन भुजबळ सरसावले; केली मोठी घोषणा !

रोहित पवार यांनी म्हटले की, कांदा अनुदानासाठी ८५७ कोटीची गरज आहे, हे माहित असताना देखील सरकारने कांदा अनुदानासाठी पुरवणी मागण्यांमध्ये केवळ ५५० कोटींची तरतूद केली. त्यामध्येही केवळ ४६५ कोटी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे.

परिणामी आज पाच महिने उलटूनही अनुदानाचा एक रुपयाही मिळू न शकलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची संपूर्ण रक्कम मिळण्याची शक्यता नाही. निधीअभावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त केवळ दहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे. उर्वरित अनुदान मिळेपर्यंत कदाचित अजून एक वर्ष जाईल.

बंडखोर आमदारांच्या संरक्षणाला १५० कोटी, नाराज आमदारांना दीडशे-दिडशे कोटींची खिरापत वाटण्यासाठी, नाराज आमदारांच्या साखर कारखान्यांना हजारो कोटीची मदत देण्यासाठी, जनतेला वेठीस धरून ठेवणाऱ्या शासन आपल्या दारीच्या एकेका कार्यक्रमास ८-८ कोटी खर्च करण्यासाठी आहेत.

तसेच जाहिरातीसाठी ५२ कोटी, गेल्या वर्षी केलेल्या कामांच्या यंदा जाहिराती करण्यासाठी ३२ कोटी शासन खर्च करू शकते. परंतु शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सरकार शेतकरी हिताच्या गोष्टी करते. शेतकऱ्यांसाठी कळवळा केवळ भाषणांमधून दाखवणार का? का प्रत्यक्षात पण कधीतरी काहीतरी करणार, असा प्रश्न श्री. पवार यांनी उपस्थित केला आहे.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com