Ajit Pawar Vs Rohit Pawar: अजितदादांच्या बालेकिल्ल्यात रोहित पवारांची जोरदार एन्ट्री; पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यात अनेकांची घरवापसी

Pimpri-Chinchwad NCP : पिंपरी-चिंचवडमध्ये रोहित पवारांचा दौरा, पक्ष संघटनेचा घेतला आढावा.
Rohit Pawar
Rohit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१७ पर्यंत सत्ता असेपर्यंत अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराचे कारभारी होते. आता राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडचे कारभारी अजितदादांचे पुतणे आमदार रोहित पवार हे झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहित पवारांना उद्योगनगरीत लक्ष घालायला सांगितले. या पार्श्वभूमीवरच रोहित पवारांनी पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यादरम्यान शहरात जोरदार एन्ट्री केली. कार्यकर्त्यांनीही त्यांचे जोरदार स्वागत केले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवडला नवे अध्यक्ष तुषार कामठे हे रविवारी मिळताच त्यांच्यासह नवे कारभारी लगेच कामाला लागले. पक्षाची त्यांनी बैठक घेऊन आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीवर चर्चा केली. तत्पूर्वी आजोबांप्रमाणे रोहित पवार यांनीही अचूक वेळ पाळत आपल्या शहर दौऱ्याची सुरुवात सकाळी दहा वाजता केली.

Rohit Pawar
Mitkari's Warning To Fadnavis : मिटकरींचा फडणवीसांना थेट इशारा; म्हणाले गोप्यासारख्या रानडुकराला आवरा, अन्यथा...

निगडी येथील भक्तीशक्ती चौकात अभिवादन केल्यानंतर त्यांची पिंपरी चौकापर्यंत शहराच्या मध्य भागातून जोरदार बाईक रॅली काढून स्वागत करण्यात आले. त्यामुळे वातावरणनिर्मितीही झाली. दुपारी ते मान्य़वरांना भेटले. शहरातील शिवसेना भवनात तसेच काँग्रेस कार्यालयात जाऊन आघाडीचा धर्मही त्यांनी पाळला.

कोणालाही (अजित पवार गट) धक्का देण्यासाठी येथे आलो नसून विचार जपण्यासाठी आलो असल्याचे रोहित पवारांनी बैठकीनंतर स्पष्ट केले. तसेच येथील हा संघर्ष राज्यभर नेणार असल्याचे सांगत त्यांनी अजित पवार गटाला एकप्रकारे इशाराच देऊन टाकला. तसेच जे स्वार्थासाठी पलीकडे (भाजपबरोबर सत्तेत महायुतीत) गेले, त्यांना मात्र पु्न्हा प्रवेश देणार नसल्याचे त्यांनी सांगत अजित पवार यांना दार बंद झाल्याचेच सूचित केले.

Rohit Pawar
MLA Disqualification Case : सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राहुल नार्वेकरांचं मोठं भाष्य; म्हणाले, आदेशाची...

पण गेलेल्या दोन नंबरच्या नेत्यांचे स्वागत असून, त्यांची घरवापसी करून घेतली जाईल, असे ते म्हणाले. त्यातूनच त्यांनी आजच्या पहिल्याच बैठकीत काही पक्षप्रवेश घडवून आणले. माजी उपमहापौर विश्रांती पाडळे, माजी शहर सरचिटणीस शिरीष जाधव यांची घरवापसी झाली. माजी अपक्ष नगरसेवक गणेश भोंडवे तसेच गणेश बालवडकर यांनीही या वेळी शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश केला. पलीकडे गेलेल्यांतील अनेक माजी नगरसेवक संपर्कात असल्याचे रोहित पवार यांनी या वेळी सांगितले.

पलीकडे (महायुतीत) आता खिचडी झाल्याने निवडणुकीला तिकिटावरून तेथे गोंधळ होणार असल्याचे भाकीतही रोहित यांनी या वेळी केले. इकडे आम्ही (मविआ), मात्र ताकदीने, विश्वासाने एकत्रितपणे निवडणूक लढणार आणि जिंकणारही आहे, असे ते म्हणाले. प्रतिगामी विचार असलेल्या पलीकडच्यांत भांडण असून, आमचे ते विचारांचे आहे, असे ते म्हणाले. तसेच शहरातील जे पक्षाचे जे नेते, पदाधिकारी तथा माजी नगरसेवक अजित पवारांबरोबर गेले, ते चांगलेच झाले असे सांगत त्यांच्यामुळे पार्टी शहरात वाढली नव्हती, असा हल्लाबोल त्यांनी केला.

Edited By- Ganesh Thombare

Rohit Pawar
Mitkari's Warning To Fadnavis : मिटकरींचा फडणवीसांना थेट इशारा; म्हणाले गोप्यासारख्या रानडुकराला आवरा, अन्यथा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com