खबरदार, गावात बालविवाह झाल्यास सरपंचपद जाणार!

तृतीयपंथीसाठी राज्यातील पाहिले रुग्णालय पुण्यात सुरू होणार आहे
Rupali Chakankar
Rupali Chakankar Sarkarnama
Published on
Updated on

चाकण (जि. पुणे) : राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून राज्यातील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. बालविवाह प्रतिबंधक कायदा असतानाही राज्यात बालविवाह होत आहेत. ते रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजेत. मुलींच्या वयाची खोटी नोंद केली जाते. ज्या ठिकाणी बालविवाह होतील, त्या गावच्या सरपंचाचे पद रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेच, वयाबाबत खोटी नोंद करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (NCP) प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिला. (Rupali Chakankar say's sarpanch post will be cancled if child marriage happend)

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चाकणकर यांचा खेड तालुक्यातील चाकण येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी बोलताना वरील माहिती दिली. त्या म्हणाल्या की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिले. मी आंदोलन केले, संघर्ष केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे. राज्यातील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. टीका करणे विरोधकांचे कामच असते, ती करत राहतात. आपण आपले काम करत राहावे.

Rupali Chakankar
परमबीरसिंहांचा पाय खोलात! वाझेसोबतची भेट पडणार महागात

माझा सत्कार होत असताना राज्यातील महिलांना सुरक्षा देणे महत्वाचे काम आहे. पन्नास टक्के आरक्षण आमच्या हक्काचे आहे. वंशाला दिवा हवा म्हणून गर्भपात केला जातो. हुंडाबळींची समस्या राज्यात आहे. समाजात मुलींचे महिलांचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्याचा माझा प्रयत्न आहे. तसेच, पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीयासाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्याचा आमचा मानस आहे, असेही चाकणकर यांनी सांगितले.

Rupali Chakankar
सोलापूर जिल्हा बॅंकेच्या नशिबातील गुलाल कोणी रोखला?

आमदार दिलीप मोहिते म्हणाले की, महिलांना न्याय देण्याचे काम तुम्ही उत्तमप्रकारे कराल. चाकणच्या एका सुनेचा सत्कार केला आहे, ही आनंदाची बाब आहे. महिला राजकारणात आल्या, याचे श्रेय शरद पवारांचे आहे. महिला आरक्षण लागू झाल्यानंतर माझ्या पत्नीला राजकारणात संधी मिळाली, ती जिल्हा परिषदेची सदस्य झाली.

Rupali Chakankar
यशवंतरावांच्या समाधीवर पद्मश्री ठेवून पोपटराव पवारांनी केले अभिवादन

या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, माजी आमदार राम कांडगे यांंचीही भाषणे झाली. या वेळी खेड पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, सुरेखा मोहिते, सुरेखा टोपे, अरुण चांभारे, कैलास लिंभोरे, विलास कातोरे, चंद्रकांत इंगवले, किरण मांजरे, नितीन गोरे, शोभा शेवकरी, मंगल शेवकरी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com