मुंबई : रिझर्व्ह बॅंकेकडून (RBI) देण्यात आलेल्या माहितीनुसार रूपी बॅंक (Rupee Co-operative Bank Limited) उद्यापासून (22 सप्टेंबरपासून) आपलं काम बंद करणार आहे. रुपी बँकेला कोर्ट आणि केंद्राकडून दिलासा मिळालेला नाही. रुपी बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द करण्यात आला आहे. (Rupee Co-operative Bank latest news)
मागील काही दिवसांपासून आरबीआय बॅंक आणि वित्तीय संस्थांवर कारवाई करत आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून नियमांचं पालन न केल्याच्या कारणावरून रूपी को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेडवर कारवाई करण्यात आली आहे. आता रूपी बॅंकेला 22 सप्टेंबरपासून टाळं लावलं जाणार आहे.
ही पुणे स्थित बॅंक आहे. 22 सप्टेंबरला आता त्याच्या आदेशाची अंमलबजावणी होत बॅंकिंग सर्व्हिस बंद होणार आहे. आरबीआय कडून जारी नोटिसीमध्ये बॅंकेची आर्थिक स्थिती नीट नसल्याचं सांगण्यात आले आहे. रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक स्थिती पाहता मध्यवर्ती बँकेने तिचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरबीआयच्या या कारवाईनंतर ग्राहक ना पैसे टाकू शकत, ना काढू शकत. तसेच कोणताही आर्थिक व्यवहार देखील केला जाऊ शकत नाही. 'बॅंकेची आर्थिक स्थिती योग्य नाही भविष्यात ती सुधारण्याची शक्यताही नाही. त्यामुळेच या बॅंकेचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे,'असे आरबीआयने सांगितले आहे.
या बॅंकेमध्ये ज्या ग्राहकांचा पैसा आहे त्यांना आरबीआयच्या डिपॉजिट इंश्युरंस अॅन्ड क्रेडिट गॅरंटी कोऑपरेशन इंश्युरंस योजना अंतर्गत 5 लाख रूपयांचा इंश्युरंस कव्हर मिळणार आहे. या नियमानुसार जर बॅंक आर्थिक स्थितीतून डबघाईला गेल्यास ग्राहकांना DICGC नुसार 5 लाखापर्यंतची रक्कम डिपॉझिट वर इंश्यूरन्स कव्हर म्हणून दिले जातात.
रिझर्व्ह बँकेने 10 ऑगस्ट रोजीच एक प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली होती. यामध्ये सहा आठवड्यांनंतर रुपी सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर बँकेच्या सर्व शाखा बंद होतील आणि ग्राहकांना त्यांचे पैसे काढता येणार नाहीत. आता 22 सप्टेंबरपासून रिझर्व्ह बँकेचे आदेश लागू होणार असून रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे कामकाज बंद होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.