भाजप नेत्यांना झोपेतसुद्धा कन्हैया कुमार दिसत आहे : सचिन खरात

कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) आणि गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी (Jignesh Mevani) यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
Sachin Kharat
Sachin KharatSarkarnama
Published on
Updated on

पुणे : " विध्यार्थी नेता कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) आणि गुजरातमधील युवा आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे येणाऱ्या काळात दलित, शोषित, वंचित, महिला, शेतकरी, मजूर, कामगार यांच्या चळवळीला मोठे बळ मिळणार आहे. त्यामुळे भाजपाची (BJP) पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपच्या नेत्यांना झोपेत सुद्धा कन्हैया दिसत आहे." अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) (RPI) चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी भाजपवर केली आहे.

Sachin Kharat
हार्दिक, कन्हैया, जिग्नेश काँग्रेससाठी नवसंजीवनी!

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष व कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैया कुमार आणि गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी काल (ता.२८ सप्टेंबर) काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केसी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

आगामी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडूकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. कन्हैया आणि जिग्नेश हे काँग्रेसमध्ये सामील झाल्यामुळे कॉग्रेसकडून त्यांचा उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल प्रदेशात प्रचारासाठी वापर होऊ शकतो. अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. समाजवादी पार्टी व बसपाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसशी युती करणार नसून स्वबळावर निवडणुका लढवणार असे स्पष्ट केले आहे. यामुळे कन्हैया व जिग्नेश यांच्या प्रवेशाने काँग्रेसला फायदा होईल असे बोलले जात आहे.

त्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी टीका करतांना म्हणाले, "जर कोणी गटारातून बाहेर पडून नाल्यात पडला तर, मी फक्त त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करू शकतो," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पश्चिम बंगालच्या भवानीपूर येथे ते बोलते होते. यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे राष्ट्रीय अध्यक्ष खरात यांनी कन्हैया कुमार बाजू घेत, या प्रवेशामुळे भाजपच्या नेत्यांना झोपेत सुद्धा कन्हैया दिसत आहे. अशी टीका खरात यांनी केली आहे.

Sachin Kharat
कन्हैया अन् जिग्नेश मेवानी यांनी सांगितलं काँग्रेसमध्ये येण्याचं कारण...

काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर कन्हैया प्रतिक्रिया देतांना म्हणाला की, "आम्ही देशातील सर्वांत जुन्या लोकशाही पक्षात प्रवेश केला आहे. कारण काँग्रेस वाचली नाही तर, देश टिकणार नाही. असे देशातील कोट्यवधी नागरिकांना वाटत आहे. विरोधी पक्ष कमकुवत झाल्यावर सत्ताधाऱ्यांची वाटचाल ही हुकूमशाहीच्या दिशेने होते. लोकसभेतील जवळपास २०० जागा अशा आहेत, जिथे भाजपसमोर काँग्रेसशिवाय कुठलाही पर्याय नाही. यामुळे देशातील सर्वात मोठ्या आणि जुन्या पक्षाला वाचवले गेले पाहीजे. मोठ्या जहाजाला बुडण्यापासून वाचवले गेले नाही, तर छोट्या होड्यांचा आणि नावांचा काहीही उपयोग होणार नाही, असेही कन्हैया म्हणाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com