Sambhajiraje Chhatrapati : 'शरद पवारांना टिंगल करण्याचा अधिकार पण...', संभाजीराजेंच जोरदार प्रत्युत्तर

Sambhajiraje Chhatrapati On Sharad Pawar : तिसऱ्या आघाडीमुळे आमची झोप उडाली, भयंकर अस्वस्थ आहोत. शरद पवारांच्या तिसऱ्या आघाडीवरील मिश्किल टिपणीवर संभाजीराजेंचे प्रत्त्युत्तर.
Sambhajiraje Chhatrapati  On Sharad Pawar
Sambhajiraje Chhatrapati On Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महायुती आणि महाविकास आघाडी बरोबरच राज्यात आता तिसरी आघाडी देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार आहे. संभाजीराजे छत्रपती, प्रहारचे नेते बच्चू कडू, शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह इतर छोटे मोठे पक्ष एकत्र येऊन परिवर्तन महाशक्ती अशी तिसरी आघाडी तयार करण्यात आली आहे. या तिसऱ्या आघाडीबाबत विचारला असता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली होती. आता त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तिसऱ्या आघाडीवर मिश्किल टिपणी करत शरद पवार म्हणाले, 'मोठ्या ताकदीचे नेते असा प्रयत्न करत असून राज्याच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही घाबरलो आहोत. कधीही जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा परिणाम होणार. संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) वगैरे एकत्र आल्यामुळे नक्कीच परिणाम होणार. त्यामुळे आमची झोप उडाली आहे. आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत. आता आपले काय होणार, असा प्रश्न आम्हाला पडला आहे', असं शरद पवार म्हणाले होते.

Sambhajiraje Chhatrapati  On Sharad Pawar
Nana Patole : "भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार"- नाना पटोले

पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी उत्तर दिला आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार (Sharad pawar) यांना टिंगल करण्याचा अधिकार आहे. इतर कोणी असत तर मी खपवून घेतलं नसतं. महात्मा गांधी कायम म्हणायचे आधी दुर्लक्ष करतील मग टिंगल करतील आणि मग ते लढतील नंतर तुम्ही जिंकाल… हे महात्मा गांधींचं प्रसिद्ध वाक्य सांगत संभाजीराजेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं.

Sambhajiraje Chhatrapati  On Sharad Pawar
Ambadas Danve News : `लाडकी बहीण` कार्यक्रमाला प्रत्येकी पन्नास महिला आणण्याचे टार्गेट ; दानवेंचा पुराव्यासह आरोप

आरक्षण आणि शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, पवार साहेब वेळोवळी आरक्षण बाबत सांगत असतात. मला माहिती आहे. जे १० टक्के आरक्षण वाढवून दिलं आहे त्यात सर्वांचा सह्या आहेत. पण मराठा समाजाला ते मान्य नाही. ७५ टक्के हवं तर पवार साहेब यांनी द्यायला हवं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com