Mantralaya Woman News: मंत्रालयासमोर विषप्राशन केलेल्या पोलिसाच्या पत्नीचे पुण्यात निधन

Sangeeta Davre passes away : संगीता यांचे पती हनुमंत डावरे हे मुंबई पोलिस दलात कार्यरत होते.
 Sassoon
Sassoon Sarkarnama

Pune News: आपल्या न्याय मागण्यांसाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पोलिस पत्नी संगीता हनुमंत डवरे (वय २८) यांचे (काल) मंगळवारी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

त्यांनी २७ मार्च रोजी मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एक मार्चला त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी सात दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा तपासणी केली. तपासणी अहवाल निगेटीव्ह आला.

 Sassoon
Sandeep Deshpande Attack News: संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट ; राजकीय व्यक्तींमास्टरमाईंड...

मंगळवारी सकाळी श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान संगीता डवरे यांचे निधन झाले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

संगीता यांचे पती हनुमंत डावरे हे मुंबई पोलिस दलात कार्यरत होते. त्यांचा अपघात झाल्यानंतर डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी संबंधित वाहनचालकाला सोडून दिल्याचा आरोप संगीता डवरे यांनी केला होता.

 Sassoon
Pune BJP News: धक्कादायक : बापटांच्या निधनाच्या दिवशीच दीडशे कोटींची निविदा मंजूर करून घेणारा भाजपचा नेता कोण ?

परंतु याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे त्यांनी मंत्रालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्यांनी २७ मार्च रोजी मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्या उपचारासाठी लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल झाल्या. कोरोनामुळे प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल होण्याबाबत येथील डॉक्टरांनी सल्ला दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com