Maval Lok Sabha Constituency : निवडून आल्यावर भाजपमध्ये जाणार नाही, 'या' उमेदवाराने मतदारांना दिले वचन!

Srirang Barane Vs Sanjog Waghere : आपल्या मतदाराला न ओळखणाऱ्या महायुतीच्या बारणेंची किव येते, महाविकास आघाडीच्या वाघेरेंचा टोला!
Sanjogh Waghere, Shrirang Barne
Sanjogh Waghere, Shrirang BarneSarkarnama

सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू आहे. निवडून आलेले विरोधी पक्षांचे आमदार, खासदार मोदींच्या पक्षात जात आहेत. मात्र, आपण निवडून आलो, तरी भाजपमध्ये जाणार नाही, असे वचन मावळमधील महाविकास आघाडीचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी मतदारांना बुधवारी दिले.

मोदींची सत्ताच येणार नाही. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, असेही वाघेरे म्हणाले. आघाडीच्या पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या मतदारांच्या मनातील शंकेचे निरसन केले. दरम्यान, या वेळी व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी वाघेरे खासदार झाल्यानंतर भाजपमध्ये गेले, तर त्यांच्या दारात आंदोलन करू, असा इशारा आधी आपल्या भाषणात दिला होता. त्यावर वाघेरेंनी आपण भूमिका बदलणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मिळत असलेल्या प्रतिसाद पाहता नक्की निवडून येऊ, असा दावाही केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjogh Waghere, Shrirang Barne
Maval Lok Sabha Constituency : रावणाची उपमा देत श्रीरंग बारणेंवर निशाणा; संजोग वाघेरे नेमके काय म्हणाले?

दोन दिवसांपूर्वी झालेल्या महायुतीच्या पिंपरी-चिंचवडमधील पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांचे उमेदवार (शिंदे शिवसेना) आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहेत, हे माहीत नाही, अर्ज दाखल केल्यावर ते कळेल, असे म्हणत वाघेरेंची दखलच घेतली नव्हती. विशेष म्हणजे वाघेरे आणि बारणे हे दोघेही पिंपरी-चिंचवडकर आहेत.

वाघेरे हे बारणेंच्या मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार आहेत. त्यामुळे, जर बारणे हे आपल्या मतदाराला (वाघेरे) ओळखत नसतील, तर त्यांची किव येते, असे वाघेरेंनी सणसणीत उत्तर बारणेंच्या परवाच्या विधानावर दिले. दहा वर्षांत त्यांनी काहीच केले नाही. मतदारसंघातील प्रश्न आहे तसेच आहेत, असा हल्लाबोल करीत तेच आपल्या प्रचाराचे मुद्दे राहणार असल्याचे वाघेरेंनी सांगितले.

Sanjogh Waghere, Shrirang Barne
Lok Sabha Election 2024: अजितदादांचा व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा गंभीर आरोप, म्हणाले; " हा तर आचारसंहितेचा भंग..."

आपण गतवेळपेक्षा (2 लाख 14 हजार) जास्त लीडने निवडून येऊ, असा दावा बारणेंनी परवा केला होता. त्याला वाघेरेंनी मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता आपण पावणेचार लाखांच्या मताधिक्याने निवडून येऊ, असा प्रतिदावा आज ठोकला. तसेच कोणाला निवडून द्यायचे याचा निर्णय सूज्ञ मतदार घेणार आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मात्र, तोच त्रस्त असल्याने महाविकास आघाडीला म्हणजे मला त्यांचा पाठिंबा मिळतो आहे, असा दावा त्यांनी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com