Maratha Students: मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! सारथीला 35 कोटी मंजूर, स्पर्धा परीक्षा, संशोधन, प्रशिक्षणाला मिळणार चालना

Chhatrapati Shahu Maharaj Research Training Institute News: राज्य सरकारने सारथी संस्थेला 35.34 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
Sarathi Pune
Sarathi Punesarkarnama
Published on
Updated on

Sarthi Fund News: मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. राज्य सरकारने सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) या संस्थेला 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण उपक्रमांना मोठी मदत मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गातील काही योजनांचा लाभ मराठा समाजालाही देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता सारथी संस्थेसाठी निधी मंजूर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

सारथी संस्था मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवते. UPSC, MPSC, बँकिंग, रेल्वे तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण, मार्गदर्शन, शिष्यवृत्ती आणि कौशल्यविकास कार्यक्रम या संस्थेमार्फत दिले जातात.

Sarathi Pune
Tukaram Munde News: तुकाराम मुंढे यांच्या नावाचीच धास्ती? FDA अधिकारी येणार म्हणून यवतमध्ये 'शटर डाऊन'

नियोजन विभागाने याबाबत शासन आदेश काढला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी सारथी संस्थेला 35 कोटी 34 लाख 23 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा निधी मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी वापरण्यात येणार आहे.

Sarathi Pune
Lok Sabha Delimitation: 170 मतदारसंघांचे विभाजन, लोकसभेच्या 824 जागा; नवा फॉर्म्युला, दक्षिण-उत्तर वाद मिटणार?

मंजूर निधीचा वापर करताना सरकारच्या आर्थिक नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच निधी खर्च झाल्यानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र सरकारकडे सादर करण्याची जबाबदारी सारथी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांवर सोपविण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या हजारो मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com