Sanjeev Thakur: ललित पाटील प्रकरण भोवलं; 'ससून'चे डीन संजीव ठाकूर यांची उचलबांगडी

Lalit Patil Case : आता पुन्हा डॉ. विनायक काळे यांची या पदावर वर्णी लागणार आहे.
Sanjeev Thakur, Lalit Patil
Sanjeev Thakur, Lalit PatilSarkarnama

Pune: राज्यभर गाजलेल्या ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात वादग्रस्त ठरलेले ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांना उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. मॅट कोर्टाचा निर्णय योग्य ठरवत न्यायालयाने संजीव ठाकूर यांची डीन पदावरून हकालपट्टी केली. त्यांच्या जागी आता पुन्हा डॉ. विनायक काळे यांची या पदावर वर्णी लागणार आहे.

ललित पाटील याला ससून रुग्णालयात पंचतारांकित सुविधा दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने संजीव ठाकूर यांना दणका दिला आहे.

Sanjeev Thakur, Lalit Patil
Thorat Vs Vikhe : विखे, पाटलांची साखर विरोधकांना कडू? 'सायलेंट व्होटर'साठी रणनीती

ससून रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची जे. जे. रुग्णालयातील उपअधिष्ठाता पदावरून पदोन्नतीने दीड वर्षांपूर्वी ससूनच्या अधिष्ठातापदी रुजू झाले होते. मात्र, तीन वर्षांच्या आतच त्यांची 13 जानेवारी रोजी तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी संजीव ठाकूर यांची ससूनच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आले.

महिनाभरापूर्वी ससूनच्या प्रवेशद्वाराजवळ तब्बल २ कोटी १४ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. ड्रग्स तस्कर ललित पाटील फरार झाला होता. यानंतर ससूनचा वॉर्ड क्रमांक १६ आणि ससूनचे संजीव ठाकूर हे चांगलेच चर्चेत आले होते.

Sanjeev Thakur, Lalit Patil
Santosh Bangar: हिंगोलीच्या पाणी प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांमध्ये ठिणगी; बांगर रस्त्यावर उतरणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com