Sambhaji Kunjir News: पुरंदरचे माजी आमदार संभाजी कुंजीर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Sambhaji Kunjir Joins NCP: मी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराव कुंजीर यांनी सांगितले.
Sambhaji Kunjir News
Sambhaji Kunjir NewsSarkarnama

Saswad News: पुरंदरचे माजी आमदार संभाजी कुंजीर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. संभाजीराव कुंजीर हे अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून अप्लित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा ते सक्रिय झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अजित पवार यांच्या पुणे येथील निवासस्थानी संभाजी कुंजीरांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. गेल्या काही दिवसापासून कुंजीर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

माजी मंत्री दादासाहेब जाधवराव यांचा पराभव करून १९८० मध्ये ते निवडून आले होते. कुंजीर राष्ट्रवादीत प्रवेशानंतर पुरंदर तालुक्यातील अनेक गावातील आजी- माजी सरपंच व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार गावागावात पोचवून पुरंदर तालुक्याचा विकास करण्यासाठी मी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. बारामती लोकसभा निवडणुकांमध्ये सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार संभाजीराव कुंजीर यांनी सांगितले.

Sambhaji Kunjir News
Rajan Patil Vs Umesh Patil : उमेश पाटलांनी कायम ठेवली राजन पाटील विरोधाची धार; ‘खरेदीखतासाठी मोहोळमध्ये यायला कुणाला भीती वाटते?’

यावेळी माजी नगराध्यक्ष मोहन वांढेकर, साहित्यिक दशरथ यादव, पुरंदर पंचायत समितीचे सदस्य बाळुतात्या यादव, विठ्ठल कटके, पोपटराव ताकवणे, एम के गायकवाड, हिरामण खेडेकर, उत्तम चव्हाण, सागर चव्हाण, गणेश यादव, अण्णा यादव, राजू कुंजीर, प्रवीण कदम अँड.मेमाणे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com