maharashtra budget 2022 : फुले वाड्याच्या जतनासाठी शंभर कोटी

कृषीक्षेत्र, कृषीसिंचन, पशुवैद्यकीय, पीक कर्ज अशा कृषीक्षेत्रांशी निगडीत बाबींसाठी अधिक तरतूद करण्यात आली.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात पुण्यातील गंजपेठेतील महात्मा फुले वाड्याच्या जतनासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले.

अजित पवार यांनी अर्थसंकल्पात विकासांची पंचसुत्री मांडली. कृषीक्षेत्र, आरोग्य, शिक्षण, समृ्द्धी महामार्ग याविषयी विविध तरतूदी करण्यात आल्या. महाविकास आघाडीचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. कृषीक्षेत्र, कृषीसिंचन, पशुवैद्यकीय, पीक कर्ज अशा कृषीक्षेत्रांशी निगडीत बाबींसाठी अधिक तरतूद करण्यात आली.

Ajit Pawar
Maharashtra Budget :सीएनजी स्वस्त होणार ; पेट्रोल-डिझेलवरील करात कपात नाही

यंदाच्या अर्थसंकल्पात पीक कर्जात वाढ करण्यात आली आहे. हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. संभाजी महाराज यांचे स्मारक हवेली तालुक्यात उभारण्यात येणार आहे. यासाठी २५ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली.

कृषीक्षेत्र हाच विकासाचा पाया आहे. त्यामुळे कृषी संशोधनासाठी अधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या करात सूट देणार नसल्याचे आजच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी सांगितले. तर सीएनजी वरील कर १३.५ टक्क्यावरुन ३ टक्क्यावर आणण्यात आला आहे.

  • महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली 30 टक्केची तरतूद आता वाढवून 50 टक्के केली आहे.

  • कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर देणार.

  • स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग प्रस्थावित

  • तृतीय पंथीयांना आता स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड देणार

  • आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद.

  • अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबाईल सेवा उपलब्ध करून देणार.

  • एसटी महामंडळ 3 हजार नवीन बस देणार आहेत

  • तृतीयपंथीयांना कर्जाची सुविधा तसंच ओळखपत्र, रेशनकार्ड

  • ओबीसीच्या नव्या आयोगासाठी खर्चाची तरतूद

  • एसटी महामंडळाच्या नव्या गाड्या प्रस्तावित आहेत.

  • शिर्डी विमानतळावर रात्रीच्या उड्डणांची सुविधा सुरु

  • हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधूदुर्ग भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी १०० खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील.

  • पुण्याजवळ 300 एकरांत इंद्रायणी मेडिसिटी उभारणार. सर्व अत्याधुनिक आरोग्य सुविधा असणारी देशातील पहिली सिटी असेल.

  • मुंबई विद्यापीठातील भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे.

  • सारथी संस्थेसाठी 250 कोटींची तरतूद कऱण्यात आली आहे. ओबीसींसाठी 3 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कमेची तरतूद

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com