#CoronaVirus नागपूर, पुणे विमानतळावरही स्क्रिनिंग सुरु होणार

कोरोना संसर्गाच्या पार्शवभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर, पुणे विमानतळावरही स्क्रिनिंग सुरु होणार असून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येणार आहे
Screening in Nagpur Pune Airports in the wake of CORONA
Screening in Nagpur Pune Airports in the wake of CORONA

मुंबई  : कोरोना संसर्गाच्या पार्शवभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर, पुणे विमानतळावरही स्क्रिनिंग सुरु होणार असून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येणार आहे. राज्यातील सोलापूर आणि लोणावळा येथे करोना रुग्ण आढळल्याच्या अफवा पसरल्या असून त्यावर विश्वास ठेवू नये,असे आवाहन राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी केले आहे. 

केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व करोना बाधित देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यात पुणे व नागपूर विमानतळावर देखील स्क्रिनिंग सुरू होणार आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ४७४ प्रवासी आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.दरम्यान बुधवार पर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५८६ विमानांमधील ६९,५०२ प्रवासी तपासण्यात आले आहेत. 

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी गुरुवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली. करोना प्रतिबंध व नियंत्रणाबाबत प्रत्येक जिल्ह्यानिहाय आढावा घेऊन मुख्य सचिवांनी यंत्रणेने करोनाची धास्ती न घेता आवश्‍यक ती खबरदारी मात्र घ्यायला हवी, हे स्पष्ट केले. येथून पुढे सर्वांनी गर्दी होणारे सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन टाळायला हवे,असे आवाहनही त्यांनी केले.

१६ संशयित रुग्णालयात दाखल 

जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत १८७ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी १७४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. इतर १३ जणांचे अहवाल आज प्राप्त होतील. आजवर भरती झालेल्या १८७  प्रवाशांपैकी १७० जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १२ जण मुंबईत तर ३ जण नाशिकमध्ये व एक नांदेड येथे भरती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com