अजित पवारांचे धक्कातंत्र : काकडे, जगतापांच्या कार्यकर्त्यांना दिली प्रथम संधी!

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी अजय कदम, तुषार माहूरकर यांची निवड
Ajay Kadam-Tushar Mahurkar-Ajit Pawar
Ajay Kadam-Tushar Mahurkar-Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (Someshwar Sugar Factory) स्वीकृत संचालकपदी आमदार संजय जगताप आणि शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. खंडाळा तालुक्यातील स्ट्रकचरल इंजिनिअर अजय कदम, पुरंदर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार माहूरकर या दोघांना स्वीकृत पद्धतीने तज्ज्ञ संचालक म्हणून संधी मिळाली आहे. दरम्यान, पुणे जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून बँकेचे नवनिर्वाचित संचालक संभाजी होळकर यांना संधी मिळाली आहे. (Selection of Ajay Kadam, Tushar Mahurkar as Expert Director of Someshwar Sugar Factory)

‘सोमेश्वर’सारख्या नामांकित कारखान्यावर स्वीकृत संचालकपदासाठीसुद्धा रस्सीखेच पहायला मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्याकडे ३२ जणांनी अर्ज केले होते. काहींनी स्थानिक नेतेमंडळीनाही साकडे घातले होते. राष्ट्रवादीच्या इच्छुकांसह सगळ्यांचे अंदाज चुकवत पवार यांनी सतीश काकडे यांचे सहकारी अजय कदम व (कै.) चंदुकाका जगताप यांचे कट्टर कार्यकर्ते सुरेश माहूरकर यांचे चिरंजीव तुषार यांच्या गळ्यात तज्ज्ञ संचालकपदाची माळ टाकली आहे.

Ajay Kadam-Tushar Mahurkar-Ajit Pawar
परदेशातील त्या बैठकीचा पर्दाफाश होण्याच्या भीतीने राऊत झिंगाट झालेत : पडळकर

कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे, त्यामध्ये काँग्रेस आणि शेतकरी कृती समिती हे सहयोगी पक्ष होते. दोन्ही पक्षांना एकेक जागा देण्यात आली होती. आता स्वीकृत संचालक निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांचा विचार होईल, अशा अपेक्षांना धक्का देत पवार यांनी पहिल्या वर्षी काँग्रेस आणि शेतकरी कृती समिती या सहयोगी पक्षांना संधी दिली आहे. राष्ट्रवादीच्या इच्छुकांना पुढील वर्षाची वाट पहावी लागणार आहे.

Ajay Kadam-Tushar Mahurkar-Ajit Pawar
बारा आमदारांची लढाई आता नितीन बानगुडे लढणार

अजय कदम हे बाळू पाटलाचीवाडी (ता. खंडाळा) येथील बांधकाम अभियंता असून शेतकरी कृती समितीचे सक्रीय कार्यकर्ते व साखर कारखानदारीतील जाणकार आहेत. त्यांचे वडील एन. के. कदम यांनी कारखान्याचे चीफ केमिस्ट हे पद भूषविलेले आहे. त्यांच्या निवडीने खंडाळा तालुक्याला इतिहासात प्रथमच दुसरा संचालक मिळाला आहे. तुषार माहूरकर (माहूर, ता. पुरंदर) हा तिशीतल्या कार्यकर्त्याकडे युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष असून त्यांच्या पत्नी पूनम माहूरकर या उपसरपंच आहेत. तुषार यांच्या रूपाने माहूर गावाला मानसी जगताप यांच्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनी दुसरी संधी मिळाली आहे. अजित पवार यांच्या सूचनेनुसार दोन्ही निवडी एक वर्षासाठी राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे.

Ajay Kadam-Tushar Mahurkar-Ajit Pawar
"मी पुन्हा तालिका अध्यक्षांच्या खुर्चीवर बसणार नाही" ; भास्कर जाधवांची मोठी घोषणा

सध्याच्या निवडणुकीत उमेदवारीपासून वंचित राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान गटाच्या इच्छुकांना ‘स्वीकृत’च्या तीव्र अपेक्षा होत्या. मात्र त्यांना आणखी वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

संभाजी होळकर पुणे जिल्हा बॅंकेचे प्रतिनिधी

दरम्यान, पुणे जिल्हा बँकेच्या वतीने कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये डॉ. दिगंबर दुर्गाडे हे अनेक वर्ष संचालक होते. मात्र, ते बँकेच्या अध्यक्षपदावर पोचले आहेत. आता अजित पवार यांच्या सूचनेनुसार बँकेचे नवनिर्वाचित संचालक संभाजी होळकर यांना त्या पदावर संधी देण्यात आली आहे. कामगार संचालक पदासाठी दोन्ही कामगार संघटनांनी आपापले प्रतिनिधी म्हणून तानाजी सोरटे व रमेश जगताप यांनी नावे दिली होती. मात्र, त्या निवडीबाबत संचालक सभेत आज चर्चा झाली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com