
Pune News: स्पष्ट शब्दोच्चार आणि आपल्या भाषा शैलीने ‘दूरदर्शन’वर वृत्तनिवेदक म्हणून स्वत:चा वेगळा ठसा उमटविणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक प्रा. अनंत भावे (वय ८८) यांचे काल (रविवारी)पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते.बालसाहित्यामधील योगदानाबद्दल प्रा. भावे यांना २०१३ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.
त्यांच्या पत्नी मराठी समीक्षक, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांचे २०२० मध्ये मुंबईत निधन झाले. त्यानंतर ते पुण्यातील बाणेरमधील ‘अथश्री’ अपार्टमेंट्समध्ये वास्तव्यास होते. ‘ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने नवीन पिढीची भाषा आणि आवड बदलली आहे. मुलांना कविता आपलीशी वाटण्यासाठी त्यांच्यावर ‘ऐकण्याचा’ संस्कार केल्यास त्यांना कविता नक्कीच जवळची वाटेल,’ असा त्यांचा विश्वास होता.
मुंबईतील सोमय्या महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून प्रा. भावे यांनी काम पाहिले.‘अज्जब गोष्टी गज्जब गोष्टी’, ‘अशी सुट्टी सुरेख बाई’, ‘कासव चाले हळूहळू’, ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’, ‘चिमणे चिमणे’ अशी त्यांची ५० हून अधिक बालवाङ्मय आणि कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी साप्ताहिक ‘माणूस’ मध्ये स्तंभलेखन केले. दै.‘महानगर’मध्ये त्यांचे ‘वडापाव’ हे खुसखुशीत लोकप्रिय सदर होते.
एक अतिशय सालस, सभ्य, कणखर भूमिकेचे आमचे स्नेही गेले. पुष्पा भावे आणि अनंत भावे हे महाराष्ट्रातील आदर्श पुरोगामी युगल होते. मुलांमध्ये साने गुरुजींसारखे रमणारे, प्रत्येक साहित्य संमेलनात हमखास भेट देणारे, दादरच्या फलाटावर लोकलच्या गर्दीतही पुस्तक हातात घेऊन शांतपणे लोकलची वाट बघत वाचत दिसणारे अनंत भावे अशी त्यांची खूप रूपं आठवून गेली, अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र जोशी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.