मंचर (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा देवस्थान येथे बैलगाडा शर्यतीचे लवकरच आयोजन केले जाणार आहे. शर्यतीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना निमंत्रित केले जाईल. कोरोनाचे नियम व अटी पळून बैलगाडा शर्यती भरविल्या जातील, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी सांगितले. (Sharad Pawar, Ajit Pawar invites to watch bullock cart race!)
मंचर येथे शिवगिरी मंगल कार्यालयात वयोश्री योजना बैठकीत वळसे-पाटील बोलत होते. ते म्हणाले की, बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी; म्हणून राज्य व केंद्र सरकार स्तरावर तसेच सर्वोच्च न्यायालयातही तज्ज्ञ वकिलांची फौज उभी करण्याचे काम शरद पवार, अजित पवार, केदार यांच्यासह महाविकास आघाडीने केले आहे. शर्यती सुरू होण्यात असलेले अडथळे दूर झाले आहेत.
निघोटवाडी (ता. आंबेगाव) येथेही जय हनुमान यात्रा उत्सवानिमित्त गावकऱ्यांनी मंगळवारी (ता. २२ फेब्रुवारी) आणि बुधवारी (ता. २३ फेब्रुवारी) रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. या दोन्ही यात्रा व्यवस्थित पार पाडण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. शर्यती सुरू होण्यात असलेले अडथळे दूर झाले आहेत, पण सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व सहकार क्षेत्रातील निवडणुकाही जवळ आल्या आहेत. त्या दृष्टीनेही योग्य नियोजन होण्यासाठी बैठकांचे आयोजन केले जाईल.
कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे. याचा अर्थ करोना संपला असा कोणीही काढू नये. सध्या गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरण्याची संख्या वाढत आहे. ही बाब चिंता वाढविणारी आहे. कोरोना पूर्णपणे संपुष्टात येईपर्यंत नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व सँनिटायझरचा वापर केला पाहिजे, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.