Sharad Pawar: ऑल इज वेल...ऑल इज वेल: बारामतीच्या विजयातून शरद पवारांचा थेट संकेत

Baramati Lok Sabha Elections 2024 winner: शरद पवार यांच्यासोबत त्यांचे कायम असणे, संसदेतील कामगिरी, भाषेवरील प्रभुत्व, मितभाषी स्वभाव या मुळे जरी पदाधिका-यांनी त्यांची साथ सोडली तरी मतदार त्यांच्यासोबत राहिले हेच या निकालाने दाखवून दिले.
Baramati Lok Sabha Elections 2024 winner
Baramati Lok Sabha Elections 2024 winnerSarkarnama

Baramati News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार (Baramati Lok Sabha) संघात सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा तब्बल १ लाख मतांनी पराभव केला आहे. नणंद-भावजय लढतीत अखेर नणंदच 'वरचढ' ठरली. शरद पवार (Sharad Pawar) यांचा करिष्मा आजही बारामतीत कायम असल्याचे या निकालाने अधोरेखीत केले.

निवडणूकीत अजित पवार यांचे कुटुंबिय वगळता इतर बहुसंख्य पवार कुटुंबियांनी सुप्रिया सुळे यांना साथ देण्याचा निर्णय घेत त्यांचा प्रचार केला. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका काही मतदारांना रुचली नाही. त्याचा फटका या निवडणूकीत त्यांना सहन करावा लागला. स्वत: अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा झंझावात केला होता, मात्र मतदारांनी शरद पवार यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे निकालातून स्पष्ट झाले.

अत्यंत चुरशीची निवडणूक होईल असा अंदाज वर्तविला गेला होता मात्र अपवाद वगळता बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर व खडकवासला या सहाही विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती, ती शेवटच्या फेरीपर्यंत कायमच राहिली.

आमदार, पदाधिकारी हे जरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने दिसत असले तरी मतदारांनी मात्र शरद पवार यांच्याच पारडयात मत टाकून आपला विश्वास त्यांच्याप्रती चौथ्यांदा व्यक्त केला. काही विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे तर काही मध्ये सुनेत्रा पवार आघाडी घेतील अशी जाणकारांची शक्यताही मतदारांनी मोडीत काढली. सर्वच विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनाच मतदारांनी पसंती दिली.

Baramati Lok Sabha Elections 2024 winner
Dhule Lok Sabha Election 202Results Live: भामरे, बच्छाव यांची धाकधुक वाढली; फेर मतमोजणी सुरु

अजित पवारांनी या निवडणूकीत एकटे पडूनही चुरशीची लढाई करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. ज्या पदाधिका-यांच्या जिवावर अजित पवारांनी विजयाची आकडेवारी मांडली होती ते पदाधिकारी कुचकामी असल्याचेच या निकालाने दाखवून दिले.

सुप्रिया सुळे यांनी मतदारांना त्यांच्या कामाच्या जोरावर मागितलेली मते, शरद पवार यांच्यासोबत त्यांचे कायम असणे, संसदेतील कामगिरी, भाषेवरील प्रभुत्व, मितभाषी स्वभाव या मुळे जरी पदाधिका-यांनी त्यांची साथ सोडली तरी मतदार त्यांच्यासोबत राहिले हेच या निकालाने दाखवून दिले. सुरवातील माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना विरोध केला, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिवतारे यांनी आपली तलवार म्यान केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com