राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मोदींचा व्हिडिओ व्हायरल ; फडणवीसजी, उत्तर द्याल का?

आव्हाड आणि मिटकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
sharad pawar, pm modi
sharad pawar, pm modisarkarnama

पुणे : ''राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)हे दाऊदचा माणूस (dawood ibrahim)असल्याची शंका येते,'' असा आरोप भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी दोन दिवसापूर्वी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मलिक यांचा दाऊदशी संबध असल्याचा आरोप मलिकांवर करण्यात येत आहे. या दोन्ही घटनावरुन सध्या भाजपने महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे.

शरद पवार आणि नवाब मलिक यांच्यावर होत असलेल्या या आरोपाला राष्ट्रवादीचे नेते, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad)व अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आव्हाड आणि मिटकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

''मुंबईला दाऊदपासून कुणी वाचवलं ऐका खुद्द मोदींच्या तोंडुन. देवेंद्र फडणवीसजी (Devendra Fadnavis)व उर्वरीत गँग उत्तर देईल का?,'' असे प्रश्न मिटकरी यांनी आपल्या टि्वटमधून भाजप नेत्यांना विचारला आहे. तर ''अंडरवर्ल्ड अन् शरद पवारांबद्दल पंतप्रधान मोदीजी हे काय बोलत आहेत ? ज्यांना समजेल त्यांनी वाचावे बाकीच्यांनी बक बक चालू ठेवावी,'' असा टोला आव्हाडांनी लगावला आहे.

रत्नागिरी येथील कार्यक्रमात निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असतांना फडणवीस हे सर्वांना पुरून उरतील आणि असे ठाकरे आणि पवार ते खिशात घेऊन फिरतात, असे वक्तव्य केले होते. ''शरद पवार हे दाऊदचा माणूस आहे,''असे निलेश राणे म्हणाले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद पवारांबाबत या व्हिडिओमध्ये मोदी म्हणतात..

"मुंबई आपल्या आर्थिक जीवनाला गती देणारं शहर आहे. एक काळ असा आला, जेव्हा अंडरवर्ल्डने या मुंबईतील जनजीवन एकप्रकारे उद्ध्वस्त करून टाकलं. अंधकारमय वातावरण निर्माण झालं होतं की, जर मुंबई अंडरवर्ल्डच्या हातात गेली तर काय होणार? मी सांगतो शरद पवार यांची हिंमत आणि कौशल्य होतं की, त्यांनी मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचवलं. बाहेर काढलं. हे त्यांचं सामर्थ्य होतं. एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून शरद पवारांनी सर्वत्र ओळख आहे,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com