Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका चर्चासत्राच्या निमित्ताने पहिल्यांदाच पुण्यात एकत्र येत आहेत. काही दिवसापूर्वी पु्ण्यात आयोजित एका कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवार यांच्यासमोर येणे टाळले होते. आता वळसे पाटील या कार्यक्रमाला जाणार की नाही, हे लवकरच समजेल. अजित पवार यांच्यासोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणारे दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (पुणे) येथे आज (शनिवारी) राष्ट्रीय सहकारी साखर महासंघातर्फे तांत्रिक चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (शरद पवार गट), दिलीप वळसे पाटील एकत्र येणार आहेत. ऊस स्वच्छतेच्या यांत्रिक प्रणालीचे तंत्रज्ञान व बायो सीएनजी या नव्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण यावेळी होणार आहे.
केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांचा नुकताच पुणे दौरा झाला. यावेळी महाराष्ट्रात सहकार क्षेत्राला बळकटी आणण्याची जबाबदारी शाह यांनी वळसे पाटलांवर सोपवली.त्यानंतर आज शरद पवार आणि वळसे पाटील हे मांजरीतील या कार्यक्रमात एकत्र येत आहेत.
वळसे पाटलांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. "चाळीस वर्षे सोबत राहूनही अनेकांना साहेब कळले नाहीत याची खंत आहे," अशी टीका रोहित पवारांनी वळसे पाटलांवर केली होती.
वळसे-पाटील यांनीही रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. रोहित पवारांमुळे शरद पवार यांची साथ सोडली. कामे होत नव्हती म्हणून आम्ही हा निर्णय घेतला, असा आरोप दिलीप वळसे-पाटील यांनी केला होता.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.