Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवार गट आक्रमक; अजित पवार गटाविरोधात गंभीर तक्रारी, कुठं काय घडलं?

Baramati Lok Sabha Constituency : खडकवासला येथे महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरांनी इव्हीएम मशीनची पूजा केली. हा प्रकार निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचा भंग करणारा असल्याने चाकणकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama

Baramati Political News : बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानादिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आमदार रोहित पवारांनी मंगळवारी (ता. 7) सकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटावर पैसे वाटपाचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, मतदारसंघात विविध ठिकाणी घडलेल्या गैरप्रकारांवर आक्रमक भूमिका घेत शरद पवार गटाने अजित पवार गटाविरोधात थेट निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तीन तक्रारी दाखल केल्या आहेत. यात पैशांचे वाटप, धमकी, शिवीगाळ आदी प्रकारांचा समावेश आहे. ⁠⁠सुप्रिया सुळे Supriya Sule यांच्या वतीने अॅड. प्रांजल अग्रवाल यांनी निवडणूक निर्णय अधिकारी संबंधित पोलिस ठाण्यात आणि निवडणूक आयोगाकडे या तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारींसोबत पुरावे म्हणून संबंधित व्हायरल झालेले व्हिडिओही जोडण्यात आले आहेत.

शरद पवार Sharad Pawar गटाच्या वतीने पहिली तक्रार भोर विधानसभा मतदारसंघात करण्यात आली आहे. येथे पैसे वाटपाचे संदर्भात शरद पवार गटाकडून तक्रार दाखल केली आहे. या पैसे वाटपाचे व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाले होते. इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावात अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यास शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

अजित पवार गटाच्या नेत्या, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर Rupali Chakankar यांच्यावरही निवडणूक नियमांचे भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. ⁠खडकवासला विधानसभा मतदारसंघात चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केली होती. त्याप्रकरणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता दिवेदी यांच्याकडून सुमोटो तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, आमदार रोहित पवारांनी Rohit Pawar बारामती लोकसभा मतदारसंघात मोठे गैरप्रकार घडल्याचा आरोप केले आहेत. ते म्हणाले, मतदारसंघात 155 संवेदनशील बूथ आहेत. मतदानाच्या दिवशी सकाळपासून 250 तक्रारी आल्या आहेत. त्यातील 18 तक्रारी पैसे वाटपाच्या आहेत. आठ मारहाण शिवीगाळ, 38 ईव्हीएम बंद पडल्याबाबत तक्रारी आहेत. वेल्हे येथे बोगस मतदान करण्याचा प्रयत्न झाला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com