Chetan Tupe : भेटीसाठी कासावीस झालेल्या चेतन तुपेंकडे पवारसाहेबांनी पाहिलंही नाही; नेमकं घडलं काय?

Chetan Tupe Join Ajit Pawar Ncp : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारसाहेब आणि आमदार चेतन तुपे पहिल्यांदाच व्यासपीठावर एकत्र आले होते. पण...
sharad pawar chetan tupe (2).jpg
sharad pawar chetan tupe (2).jpgsarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर 'वेट अॅण्ड वॉच'ची भूमिका घेतल्यानं हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्यांदाच आमदार चेतन तुपे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवारसाहेब एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात एकत्र आले होते. यावेळी पवारसाहेबांनी चेतन तुपेंना 'इग्नोर' केलं. याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पुणे शहर आणि परिसरातील सर्वच आमदारांनी अजितदादांना साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, आमदार चेतन तुपे यांनी 'तटस्थ' राहत 'वेट अॅण्ड वॉच'ची भूमिका घेतली. नंतर राजकीय वारे पाहून चेतन तुपे अजितदादांच्या पक्षात सहभागी झाले. त्यानंतर पहिल्यांदाच पुण्यातील कार्यक्रमात पवारसाहेब आणि चेतन तुपे एका व्यासपाठीवर एकत्रित आले.

नेमकं घडलं काय?

हडपसर मतदार संघातील वानवडी येथे सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीनं गोल्डन जुलै कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर शरद पवारसाहेब, माजी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादीचे ( शरदचंद्र पवार ) शहराध्यक्ष प्रशांत जगपात व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर चेतन तुपे व्यासपीठावर शरद पवारसाहेबांची भेटण्यासाठी वाट बघत होते. मात्र, पवारसाहेबांनी चेतन तुपे यांना न बघता पुढे निघून गेले, अशी माहिती मिळत आहे. याची चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कार्यक्रमात पवारसाहेब काय म्हणाले?

"सातारा आणि सातारा जिल्ह्याचा इतिहास सांगायला बराच काळ लागेल. महाराष्ट्रासाठी साताऱ्यानं अनेक त्याग केले आहेत. महाराष्ट्र आणि देशाच्या स्वात्रंत्र्य लढ्यात साताऱ्यातील अनेक लोक होते. सातारा जिल्ह्यानं अनेक अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दिले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री देखील सातारा जिल्ह्याचे होते. इंग्रजांच्या काळात सातारकरांनी विरोधाची भूमिका दाखवली. माझ्या पूर्वजांनी सातारा जिल्ह्यात शेती केली. त्यामुळे मी पण सातारकर आहे," असं शरद पवारांनी सांगितलं.

"हा राजकीय कार्यक्रम नाही"

कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चेतन तुपे म्हणाले, "हा राजकीय कार्यक्रम नव्हता. तर, सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे निमंत्रक यशवंत अण्णा साळुंखे यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांनी मला कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं होतं. लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणं माझं कर्तव्य आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com