Daund Politics : मानेंच्या बदल्यात कटारिया? दौंडमध्ये शरद पवारांची मोठी खेळी

Premshukh Katariya And Sharad Pawar : आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंचे इंदापूर तालुक्यातील प्रचारप्रमुख प्रवीण माने ऐनवेळी अजित पवार गटात सहभागी झाले. यानंतर लगेच पवारांनी दौंडमध्ये आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत.
Premshukh Katariya, Sharad Pawar, Supriya Sule
Premshukh Katariya, Sharad Pawar, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Baramati Political News : बारामती लोकसभा मतदारसंघात आपले वजन वाढण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच चुरस लागल्याचे दिसून येत आहे. आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंचे इंदापूर तालुक्यातील प्रचारप्रमुख प्रवीण माने ऐनवेळी अजित पवार गटात सहभागी झाले. यानंतर लगेच पवारांनी दौंडमध्ये आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. यातूनच त्यांनी रविवारी (ता. 7) प्रेमसुख कटारिया यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. Sharad Pawar try to Increase power for Lok Sabha Election.

कटारिया हे आमदार राहुल कुल Rahul Kul यांचे कट्टर समर्थक आहेत. ते दौंडमध्ये नागरिक हित संरक्षण मंडळाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. दौंडमध्ये मानणारा वर्ग मोठा असल्याने कटारिया यांचा तालुक्यावर एकहाती अंमल आहे. दौंडच्या दौऱ्यात पवार-कटारिया यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे. त्यामुळे इंदापूरमधील मानेंच्या बदल्यात दौंडमधील कटारिया अशी खेळी पवार करणार तर नाहीत ना, अशी चर्चा बारामती मतदारसंघात सुरू झाली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या सुनेत्रा पवार Sunetra Pawar आणि आघाडीच्या सुळेंनी यानी प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली आहे. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून अजित पवारांनी इंदापूरचे प्रवीण मानेंना आपल्या गळाला लावले. हा सुळेंना मोठा धक्का मानला जात आहे. आता त्याची भरपाई दौंडमधून करण्याच्या तयारीत शरद पवार असल्याचे बोलले जात आहे.

Premshukh Katariya, Sharad Pawar, Supriya Sule
Sangli Lok Sabha Constituency : जागावाटपाचा तेढ वाढला; महाआघाडीला कुणाची 'नौटंकी' पडणार भारी?

दौंडमध्ये शरद पवार Sharad Pawar गटाकडे अप्पासाहेब पवार, सोहेल खान यांच्यासारखे नेते आहेत. मात्र तालुक्यात अजित पवार गटाची ताकद मोठी आहे. हे ओळखून दौंडमध्ये पवारांनी अजित पवारांना शह देण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. आता कटारिया आणि पवारांत झालेली चर्चेने दौंडमधील राजकीय वातावरण बदलणारी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कटारिया काय निर्णय घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोण आहेत प्रेमसुख कटारिया?

प्रेमसुख कटारिया Premsukh Katariya हे दौंड तालुक्यातील बडे नेते आहेत. त्यांनी नागरिक हित संरक्षण मंडळाच्या माध्यमातून 50 हून अधिक काळ दौंडचे राजकारण केले. सुमारे 50 वर्षे नगरसेवक राहिलेले काटारियांनी 35 वर्षे दौंडचे नगराध्यक्ष पद सांभाळले. ते आमदार राहुल कुल यांचे कट्टर समर्थक असले तरी त्यांनी बदलत्या राजकीय स्थितीत कोणत्याही पक्षात अधिकृत प्रवेश केलेला नाही. यातूनच पवारांनी कटारिया यांची भेट घेऊन चर्चा केल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Premshukh Katariya, Sharad Pawar, Supriya Sule
Pune BJP : भाजपला धक्का! अतुल देशमुखांचा राजीनामा; शिरुरमधील महायुतीचं गणित बिघडणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com