Sharad Pawar: पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच पुण्यात सभेतून दिसणार पवारांची 'पॉवर'

Politcal News : महाविकास आघाडीच्या 'आक्रोश मोर्चा'च्या निमित्ताने शरद पवारांची ३० डिसेंबरला हडपसरमध्ये जाहीर सभा
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आणि अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात पहिली जाहीर सभा होणार आहे. हडपसरमध्ये ही सभा होणार असल्याची माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या मनमानी कारभारामुळे शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. महागाई वाढत असून सर्वसामान्यांना जगणे अवघड झाले आहे. म्हणून केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आवाज उठविण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. या आयोजनाची बैठक बुधवारी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झाली. खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला महाविकास आघाडीचे स्थानिक नेते उपस्थित होते .

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar News
नानांचा भाजपवर निशाणा ; RSS लाही धू धू धुतले | Nana Patole On BJP

याबाबत अधिक माहिती देताना कोल्हे म्हणाले, शेतकरी आक्रोश मोर्चात पुण्यात 30 डिसेंबर रोजी शरद पवार जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हजर राहण्याची शक्यता आहे. किल्ले शिवनेरीवरून या आक्रोश मोर्चाला सुरूवात होणार असून तीन दिवस मोर्चा सुरू राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हा मोर्चा जाणार आहे. मोर्चाची सांगता 30 डिसेंबरला पुण्यात सभेने होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल करताना खासदार कोल्हे म्हणाले, मोदी सरकारचा विकास रथ जनता हाकलून देत आहे. केंद्र आणि राज्य सरकारला जाग आणणे गरजेचे आहे. मोठ्या उद्योगपतींचे मोठे कर्ज माफ केले जाते. मग शेतकऱ्यांचे कर्ज का माफ होत नाही, असा सवाल कोल्हे यांनी उपस्थित केला. मोर्चाच्या निमित्ताने महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी एकजूट दाखवणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Edited By - Chaitanya Machale

Sharad Pawar News
PMC News : नोकरीची मोठी संधी; 100 कनिष्ठ अभियंत्यांची होणार भरती, महापालिकेने 'ती' अटच हटवली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com