Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजितदादांच्या 'त्या' इमोशनल कार्डवर पवारांची 'सुपर गुगली'; 'मूळचे की बाहेरचे पवार?

Baramati Lok Sabha Election 2024 : पवार कुटुंबीय सर्व निवडणुकांत अजित, सुप्रिया किंवा माझ्या मागे ठामपणे उभे राहिलेले आहे. त्यांनी लोकांत जाऊन आमची भूमिका मांडलेली आहे.
Sharad Pawar Vs Ajit Pawar :
Sharad Pawar Vs Ajit Pawar :Sarkarnama
Published on
Updated on

Baramati Political News : नणंद-भावजयीच्या लढतीत बारामती लोकसभेची निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. यातून अजित पवार थेट पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंना लक्ष्य करताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी बारामतीकरांनी यंदाही पवार आडनावाला मदत केली तर आपण सर्वजण खूष राहू, असे आवाहन अजित पवारांनी केले होते. त्याला उत्तर देताना शरद पवारांनी मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार असे म्हणत सडतोड उत्तर दिले आहे. Sharad Pawar taunts Ajit Pawar over Pawar Surname in Baramati.

पुणे येथील मोदी बागेत झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी अजित पवारांनी केलेल्या टीकांना चोख प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीकर संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. लोकसभेत अजित पवार की शरद पवार नेमकी कुणाची साथ द्यावी, याबाबत द्विधा अवस्था आहे. यावर अजित पवारांनी तोडगा काढत पवार आडनावासमोरील बटन दाबा, असा सल्ला दिला. अजितदादांच्या हे लॉजिक शरद पवारांनी दोन शब्दांतच खोडून काढले.

शरद पवार म्हणाले, अजितदादा बोलले ते खरेच आहे, त्यात चुकीचे असे काहीच नाही. पण मुद्दा असा आहे, की मूळ पवार की बाहेरून आलेले पवार! असे म्हणत पवारांनी अप्रत्यक्षपणे बारामतीकरांनी मूळ पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा द्यावा, असे सूचित केले आहे. तसेच अजित पवारांनी केलेल्या सर्व टीकांनाही त्यांनी उत्तर दिले.

पवार कुटुंबीय सर्व निवडणुकांत अजित, सुप्रिया, रोहित आणि माझ्या मागे ठामपणे उभे राहिलेले आहे. त्यांनी लोकांत जाऊन आमची भूमिका मांडलेली आहे. तर आम्ही सर्वजण शैक्षणिक क्षेत्रासह, उद्योग आणि इतर क्षेत्रात काम करत आहोत. त्यात चुकीचे काही केले नसल्याने कुणी तोंड उघडले तरी आम्हांला काही फरक पडत नाही, असे पवारांनी अजित पवारांना इशारा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar Vs Ajit Pawar :
Shahu Chhatrapati : शाहू महाराजांवर टीका, आघाडीचे नेते आक्रमक; संजय मंडलिकांना कडक शब्दांत सुनावलं

अजित पवार नेमके काय म्हणाले होते?

पहिल्यापासून आपण पवारांना साथ दिली आता काय करायचे असा बाका प्रसंग बारामतीकरांपुढे उभा आहे. तुम्ही फक्त पवार आडनाव असेल तेच बटण दाबा, म्हणजे पवारांमागे उभे राहण्याची परंपरा खंडित होणार नाही. तुम्ही १९९१ लेकाला म्हणजे मला खासदार केले. त्यानंतर वडिलांना म्हणजे साहेबांना निवडून दिले. नंतर लेकीला म्हणजे सुप्रिया सुळेंना तीन वेळा साथ दिली. आता सुनेला निवडून द्या. त्यामुळे वडील खूष, कन्या खूष, लेक खू, सूनही खूष आणि बारामतीकरही खूष!

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar Vs Ajit Pawar :
Prakash Ambedkar News : भाजप,आरएसएस कोणी संपवले ?, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com