Sharad Pawar : केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात स्वत: शरद पवार उतरणार मैदानात!

Sharad Pawar : केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधानांची भेट घेणार!
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar : सत्तेचा गैरवापर कसा होतो, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) , सामनाचे संपादक संजय राऊत (sanjay Raut) आणि काही सहकाऱ्यांचा अटकेवरून स्पष्ट होतं. आज जो कोर्टाचा निकाल लागला, तो राज्यकर्त्यांना काही सदबुद्धी घ्यावा, त्यांना विचार करायला लावणारा आहे. याचा विचार देशाच्या गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी करावा, यासंबंधी मी पंतप्रधानांशी बोलणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले आहे.

संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात बोलताना पवार म्हणाले, मी अनेक ठिकाणी बघत असतो की शून्यातून लोक उभे राहिलेत. एके दिवशी मी अमेरिकेत होतो. आणि अमेरिकेतल्या तिथल्या जागतिक बँकेत जात असतो. जागतिक बँकेत गेल्यानंतर तिकडच्या एका मराठी अधिकाऱ्याने एका कोरियन माणसाशी ओळख करून दिली. त्यावेळी मराठी अधिकाऱ्याने सांगितलं, जर शक्य झालं तर दक्षिण कोरियात जावा, आणि हे लोक काय करतात, हे बघायची संधी घ्या. त्या कोरियन माणसाने मला निमंत्रण दिलं. त्यांच्या देशात मी गेलो. ते काय करतात मी पाहायला गेलो.

ते गृहस्थ पूर्वी ट्रकचे ड्रायव्हर होते. मग यानंतर ते इंजिन तयार करत होते. नंतर ट्रक तयार करणयात येत होते. जो माणूस ट्रकचा ड्रायव्हर होता, तो ट्रकचा निर्माता झाला. आणि त्यांची फॅक्टरी मला दाखवली. आणि सकाळी ७.०० वाजता तो आणि त्याचं सगळं कुटुंब त्या कारखान्यात जातात. ७.०० ते सायं - ४.०० वाजेपर्यंत अखंड कष्ट करतात. चार वाजल्यानंतर घरी येऊन कोणी संगीत ऐकत असेल, कोणी नाटकाला जात असेल, कोणी सिनेमाला जात असेल, पण सकाळी ७.०० ते ४.०० या वेळेतला एकही मिनिट वाया न घालावता, कष्ट करून उभं राहण्याचा ध्यास त्या कुटुंबाने केला. त्या कुटुंबाचं नाव म्हणजे चॉम से येंग आहे.

Sharad Pawar
Anil Deshmukh : अनिल देशमुख जेलबाहेर येताच पत्नीला रडू कोसळले...

ते मला सांगायचे, माझे ट्रक , असेल किंवा इतर वाहन असेल ते अमेरिकेत जाईल, आणि तुझ्याही देशात जाईल. ते एकदा इकडे आले, त्यांना मी काही चांगल्या कंपन्या दाखवल्या, चांगल्या लोकांशी त्याची भेटही घडवून आणली. त्यांनी मला सांगितलं की, भारतात सुद्धा कर्तुत्व आहे. फक्त त्यांना प्रोत्साहित करा. हा भारत देश बदलल्याशिवाय राहणार नाही. तो माणूस सुरूवात शून्यातून केली. त्याचं नाव संपूर्ण जगात आहे. त्याच्या कंपनीचं नावह्युंदाई आहे.

आज तुम्ही पाहिलं असणार, की ह्युंदाईचं नाव गाड्या आज सगळीकडे आहेत. त्यांना मी सांगितलं महाराष्ट्रात कारखाना काढा. तेव्हा राज्यात वेगळं सरकार होतं. त्यांना मी सुचवलं, त्यांना मी घेऊन गेलो मुख्यमंत्र्याकडे. तेव्हा तिथं काही जमलं नाही. शेवटी त्यांनी इथे कारखाना काढायला नकार दिला. पण त्यांनी हट्ट केला की मला भारतात कारखाना काढायचा आहेच. तुम्ही दुसऱ्या राज्यात माझी ओळख करून द्या. मी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जय ललितांशी संपर्क केला. त्यांची जय ललितांशी गाठ घालून दिली. आज हजारो वाहने, तामिळनाडूमध्ये ह्युंदाईची तयार होतात. देशात जातात, देशाच्या बाहेर जातात, असे पवार म्हणाले.

हे उदाहरण मी एवढ्यासाठी सांगतो की, हा व्यक्ती ट्रक ड्रायव्हर होता. या ट्रक ड्रायव्हरची जगभरात गाड्या जातात. हे घडू शकतं.आपण जर कष्ट करण्याचा निर्धार केला, आणि जे काही नवीन असेल तर ते शिकून घेण्याची तयारी असेल तर, मला खात्री आहे की, तुमच्यात सुद्धा एखादा असा उद्योजक तयार होईल, असे पवार म्हणाले.

Sharad Pawar
Aimim : सत्तार अडचणीत असतांना देसाईंवर घोटाळ्याचे आरोप ? काय टायमिंग आहे..

आपण नेहमी फुले,आंबेडकर, या सगळ्यांचा विचार करतो. तो योग्य आहे. पण फुले,आंबेडकरांसोबत शाहू महाराज यांची दृष्टी, यांचा विचार हा सातत्याने नजरेसमोर ठेवला पाहिजे. परिवर्तन, सामाजिक समता याचा ध्यास त्यांनी घेतला. आंबेडकरांनी या देशाीच घटना लिहलेली असेल, अनेक चांगल्या गोष्टी केलेल्या असतील, पण आंबेडकरांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणारे शाहू महाराज होते. नांदगावच्या परिषेदेत सांगितलं शाहू महाराजांनी सांगितलं की, आंबेडकर तुमचा नेता आहेत असे, पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com