थेट शरद पवारच आता घालणार पिंपरीत लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसनेही आतापासूनच कंबर कसली आहे. खुद्द शरद पवारही पिंपरी महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालणार आहेत.
Sharad Pawar meets NCP leaders.
Sharad Pawar meets NCP leaders.
Published on
Updated on

पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीसाठी तीनचा प्रभाग निश्चित झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये (PCMC) सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) आतापासूनच कंबर कसली आहे. खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही (Sharad Pawar) पिंपरी महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालणार आहेत. ते महिन्यातील दोन दिवस पिंपरी-चिंचवडसाठी देणार आहेत. त्याची सुरवात ते १३ ऑक्टोबरला पक्षाच्या माजी नगरसेवकांची बैठक घेऊन करणार असून, १६ ऑक्टोबरला मेळावाही घेणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीचे १३६ माजी नगरसेवक सदस्य असलेल्या माजी नगरसेवकांच्या संघटनेनेही महापालिका निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी तयारी केली आहे. त्यासाठी संघटना प्रतिनिधी आणि शहरातील पक्षाच्या जुन्या जाणत्या नेत्यांनी शरद पवारांची आज पुण्यात बारामती हॉस्टेल येथे भेट घेतली. त्यात आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, जगदीश शेट्टी, मोहम्मदभाई पानसरे, श्याम वाल्हेकर, रामधर धारिया, अतुल शितोळे, गणेश शिंदे, श्रीरंग शिंदे यांचा समावेश होता.

तीनच्या प्रभाग रचनेनंतर आपल्याच नाही, तर सर्वच पक्षांची शहरात काय स्थिती राहील, याचा आढावा पवारांनी पक्षाच्या नेत्यांकडून घेतला. पक्षसंघटना तसेच आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची व्यूहरचना कशी करायची, यावरही विचारविनिमय करण्यात आला, असे आमदार बनसोडे यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

Sharad Pawar meets NCP leaders.
मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर कॅप्टनचा काँग्रेसला पहिला धक्का

भाजपच्या महापालिकेतील भ्रष्टाचारावरही चर्चा झाली, असे जगदीश शेट्टी म्हणाले. ते माजी नगरसेवकांच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही संघटना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडून येण्याची क्षमता असलेले काही माजी नगरसेवक पुन्हा रिंगणात उतरणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

Sharad Pawar meets NCP leaders.
किम जोंग मोठं पाऊल उचलणार अन् मिटवणार 70 वर्षांपासून सुरू असलेला वाद?

पिंपरी-चिंचवड हे कॉस्मोपॉलिटन शहर असून बाहेरील मतदार मोठ्या संख्येने इथे आहे. तरीही शहरात पक्षाच्या सातही सेलचे अध्यक्ष मराठा असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावर हे बरोबर नसल्याचे सांगत किमान तीन सेलचे अध्यक्ष बदलण्यास सांगू, असे पवारांनी सांगितले असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे शहराध्यक्ष नाही,पण किमान काही सेल अध्यक्ष बदलणार, हे निश्चित झाले आहे. फक्त कुठल्या सेलवर ही कुऱ्हाड येते हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com