Baramati Lok Sabha Constituency : बारामती लोकसभेसाठी खासदार सुप्रिया सुळेंची (Supriya Sule) उमेदवारी जाहीर केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आमदार संग्राम थोपटेंना मोठा शब्द दिला. यापुढे संग्राम यांना सर्व स्तरावर ताकद देणार असल्याचे पवारांनी अश्वासन दिले. आजपर्यंत थोपटे घराणे हे पवारांचे विरोधक म्हणून ओळखले जात होते. आता संग्राम त्यांच्या पाठीशी आपली ताकद लावणार असल्याची पवारांनी ग्वाही दिल्यानंतर दोन्ही कुटुंबातील वैर संपुष्टात येण्याची शक्यता आहे. (Sharad Pawar On Sangram Thopte)
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीतून सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुनेत्रा पवारांनी थोपटे कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतरही आपण महाविकास आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे आमदार थोपटेंनी स्पष्ट केले. यानंतर आज भोरमधील हरिश्चंद्री येथे महासभा एकनिष्ठेची! महाविकास आघाडीचा भव्य शेतकरी मेळावा पार पडला. यावेळीही थोपटेंनी सुळेंच्या मागे ताकद लावणार असल्याचे जाहीर केले.
या सभेत पवारांनी सुळेंची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर त्यांनी संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांना सर्व स्तरावर मदत करणार असा शब्दच दिला. ते म्हणाले, भोर तालुक्यातील जनतेने संग्राम थोपटेंच्या हातात नेतृत्व दिले. आज तुम्हा सर्वांच्या साक्षीने सांगतो की, संग्राम तुम्ही जे काही या तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी किंवा राज्यासाठी कराल, त्यासाठी तुमच्या पाठिशी शरद पवार (Sharad Pawar) कायम राहील.
या पूर्वी आपण वेगवेगळ्या रस्त्यावर असलो तरी यापुढे विकासाच्या संदर्भात शरद पवारांची तुम्हाला साथ असेल. शरद पवार कुणाच्या पाठिशी असले तर काय बदल होतात हे दाखवल्याशिवाय मी राहणार नाही, हा विश्वास भोर तालुक्यातील जनतेला देतो. संग्राम यांच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला ताकद आपण देऊ, हीच खात्री मी बाळगतो, अशी ग्वाहीही पवारांनी यावेळी दिली.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.