पुणे : ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आनंद दवे यांच्यावर टीका करणारी पोस्ट (Facebook post) प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी आनंद दवे (Anand Dave) यांच्यासोबत कोणिही व्यवहार करुन नये, तसेच ब्राम्हण महासंघालाही त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला होता. मात्र, ही पोस्ट पोंक्षे यांनी दोन तासातच डिलिट केल्याने यावर आता अधिकच चर्चा रंगली आहे. शरद पोंक्षे यांनी 'मी व नथुराम' ह्या पुस्तकाच्या ८ व्या आवृत्तीचे लोकार्पणाच्या वेळी आलेल्या अनुभवावरून ही पोस्ट शेअर करत लोकांना आवाहन केले होते. (Sharad Ponkshe deleted his Facebook post)
पोंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की ''माझ्या मी व नथुराम या पुस्तकाच्या ८ व्या आवृत्तीचे लोकार्पण पुण्यातील आनंद दवे यांनी त्यांच्या ब्राह्मण महासंघातर्फे करायचे ठरवले होते. त्यासाठी मी व प्रकाशक पार्थ बावस्कर पुण्यात पोहोचलो. हॉटेल कृष्णा रेसिडेंसीवर दोन खोल्या दवेंनी बुक केल्या. कार्यक्रम संपवून आम्ही घरी परतलो. या घटनेला महिना होऊन गेला. आजतागायत दवेंनी कृष्णा हॉटेलचे पैसे भरलेले नाही. व ते फोनही उचलत नाहीत. ब्राह्मण संघातर्फे कार्यक्रम केला म्हणून मी हो म्हटले. मात्र, हा माणूस मला नेहमीच डँबीस आहे असा संशय होताच, त्याने ते सिद्ध केले. अखेर प्रकाशकांनी ते पैसे भरले. तेव्हा सर्वांनी दवेबरोबर कोणताही व्यवहार करू नये, ही विनंती. सोबत त्याचा फोटो देत आहे. तसेच समस्त ब्राह्मण संघातील सभासदांनी सावध रहावे.
पोंक्षे यांच्या पोस्ट संदर्भात दवे यांवी प्रतिक्रिया व्यक केली. ते म्हणाले, "आम्ही जेवण्याची, राहण्याची कोणतीच जबाबदारी घेतली नव्हती," असं म्हणत आनंद दवे यांनी पोंक्षेंचे आरोप फेटाळले. त्यानंतर काही काही वेळातच पोंक्षे यांनी पोस्ट डिलिट केली. त्यामुळे ही पोस्ट लिहिण्यामागचा पोंक्षे यांचा हेतू काय होता हे कळाले नाही. मात्र, यानंतर सोशल मीडियावर खरा डॅंबीस कोण असा सवाल नेटकरी करत आहेत. या संदर्भात पोंक्षे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.