Sharmila Thackeray News : शर्मिला ठाकरेंच्या तळव्यावर रंगणार 'राज' रंग…

Maharashtra Navnirman Sena: पुण्यात 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'च्या वतीने मेहंदीचा कार्यक्रम रंगणार आहे.
Sharmanila Thakeray
Sharmanila Thakeray Sarkarnama
Published on
Updated on

Sharmila Thackeray News : श्रावणाची सुरवात म्हणजे सण -उत्सवांचे पर्व असते. नागपंचमीच्या सणाने हे उत्सव वेगळेपण निर्माण करतात. महिलावर्ग तर अधिकच खूश असतो, कारण त्यांना मूळातच जे आवडते, त्या नटण्या मुरडण्याला या सण-उत्सवांनी नवी निमित्ते मिळतात. नागपंचमी आणि तळव्यावरचा मेंहदीचा रंग, हे फार गोड समीकरण आहे. त्यातही अशी मेंहदी लोकप्रिय नेत्यांच्या संदर्भात रंगणार असेल, तर त्या मेंदीची चर्चा अधिक रंगतदार होणार, हे निश्चित आहे.

अशीच आगळीवेगळी मेंहदी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिलावहिनी ठाकरे यांच्या तळव्यावर रंगणार आहे ! शनिवारी पिंपरी चिंचवड परिसरात स्वतः राज ठाकरे यांनी आपल्या जोरदार वक्तव्यांचे रंगकाम केले आहेच, आता आज राज यांच्या पत्नी शर्मिलाताई आपल्या तळव्यावर मेंहदीचे कुठले रंग भरतात की राज यांचे नाव, चेहरा रेखाटतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Sharmanila Thakeray
Amol Kolhe News : महागाई नियंत्रणासाठी किती दिवस शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणार? मोदी सरकारला खासदार कोल्हेंचा थेट सवाल

पुण्यात 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'च्या वतीने मेहंदीचा कार्यक्रम रंगणार आहे. पक्षाचे पुण्यातील नेते प्रल्हाद गवळी यांनी हा कार्यक्रम घेतला आहे. त्यासाठी खास शर्मिलावहिनी, मनसेच्या नेत्या रिटा बहुगुणा येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सर्वपक्षीय महिला या कार्यक्रमात असतील; तरीही शर्मिलावहिनींची विशेष उपसिथती राहणार आहे.

शर्मिलावहिनी राजकारणात विशेषत: मनसेत कुठल्या पदावर नसल्या तरी राज ठाकरेंच्या कार्यक्रम-सभांना त्या आवर्जून हजेरी लावतात. कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी घेत असतात. पक्षाच्या कार्यक्रमांनाही जातात, अशाच एका कार्यक्रमानिमित्त शर्मिलावहिनी पुण्यात आहेत. त्या आधी त्यांनी काही पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधला.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com