SP देशमुखांनी आठवड्यातच दणका दिला अन चौथा औद्योगिक गुन्हेगार जेरबंद केला!

तो तब्बल दोन किलोमीटर उसाचा शेतात पळत सुटला होता.
Shikrapur police
Shikrapur policeSarkarnama
Published on
Updated on

शिक्रापूर (जि. पुणे) : पुणे-नगर रोडवरील तब्बल ४०० उद्योजकांचा समावेश असलेल्या डीसीसीआय (Deccan Chember of Commerce & industries) या संघटनेच्या बैठकीत तीन औद्योगिक गुंडांना जेरबंद केले आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही गुन्हेगाराला येरवड्यात पाठविणार असल्याचे जिल्हा (पुणे) पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जाहीर केले होते. त्याला आठ दिवस होत नाहीत तोच तब्बल तीन महिने गुंगारा देत असलेला चौथा गुन्हेगार आनंद पंडित कसबे याला थेट बीडमध्ये उसाच्या शेतात पाठलाग करून जेरबंद केले. शिक्रापूर पोलिसांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली असून पुणे-नगर रोड औद्योगिक क्षेत्रासाठी ती दिला देणारी ठरली आहे. (Shikrapur police Arrest a fourth industrial criminal At Beed)

डीसीसीआयच्या बैठकीत जिल्हा (पुणे) पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी औद्योगिक गुन्हेगारांना जेरबंद करण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर आठच दिवसांत ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेला आनंद कसबे हा गेल्या महिनाभरातील चौथा औद्योगिक सराईत गुन्हेगार आहे. कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना धमक्या देणारा मोकातील आरोपी वैभव आदक याचा तो जवळचा साथीदार आहे.

Shikrapur police
आता माझ्याजवळ अजितदादा नावाचं सुप्रीम कोर्ट आहे : सतीश काकडे

मागील आठवड्यात ता. ११ ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सणसवाडी (ता. शिरूर) येथे ४०० कंपन्यांच्या डीसीसीआय या संघटनेच्या बैठकीत हजेरी लावून औद्योगिक क्षेत्र गुन्हेगारमुक्त करण्याचे जाहीर केले होते.त्यातच त्यांनी मागील महिनाभरात पुणे-नगर रोडवरील तीन औद्योगिक गुन्हेगार येरवड्यात पाठविल्याचे सांगितले होते.

दरम्यान गेल्या तीन महिन्यांपासून शिक्रापूर पोलिसांना गुंगारा देणारा आनंद पंडित कसबे (वय २१, रा. करंदी, ता. शिरूर) याच्यावर सहायक पोलिस निरीक्षक नितीन आतकरे यांचे एक स्वतंत्र तपास पथक नेमले होते. पथाकातील पोलिस नाईक शिवाजी चितारे, निखील रावडे व किशोर शिवणकर यांच्या गोपनीय माहितीद्वारे कसबे हा पाडोदा (जि. बीड) येथे असल्याचे समजले. त्यानुसार या तिघांनी पाटोदा गावात दोन दिवस मुक्काम करुन त्याच्यावर पाळत ठेवली. अखेर संपूर्ण पोलिस पथक या गावात पोचताच तो तब्बल दोन किलोमीटर उसाचा शेतात पळत सुटला होता. पोलिसांनी पाठलाग करत कसबे याला पकडले होते. या संपूर्ण कारवाईत या तिघांसह पोलिस हवालदार जितेंद्र पानसरे, अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, सागर कोंढाळकर, विकास पाटील, रोहीदास पारखे, लखन शिरसकर आदींचा सहभाग होता. दरम्यान कसबे याला शिरुर न्यायालयाने २२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

Shikrapur police
फडणवीसांचा पलटवार : साहेब... जो बूँदसे गयी, वो हौद से नहीं आती!

आणखी काही गुन्हेगार रांगेत

भूषण गायकवाड (कोंढापुरी), वैभग आदक (करंदी), कौस्तुभ होळकर (कोरेगाव भीमा) आणि आनंद कसबे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात कसबे याला झोपडपट्टीदादा विरोधी कायद्यान्वये, वैभव आदक व आनंद कसबे या दोघांना मोका अंतर्गत, तर कौस्तुभ होळकर याला खंडणी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. आता पुढील काही गुन्हेगारही रांगेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली असून त्यांची नावे मात्र कारवाई केल्यावरच समजतील, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com