Shrirang Barane: खासदार बारणेंच्या मनात अजितदादांच्या राष्ट्रवादीबाबत 'ती' सल आजही कायम

Shinde Group Leader MP Shrirang Barane Allegation Ajit Pawar NCP: माझ्यासाठी ते स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण खालच्या कार्यकर्त्यांनी त्यांचेही ऐकलं नाही आणि हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दात खासदार बारणे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
Shrirang Barane
Shrirang BaraneSarkarnama

Pimpri News: लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले काम व्यवस्थित केलं नसल्याची सल आजही मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barane)यांच्या मनात कायम आहे.

सलग तिसऱ्यांदा खासदारपदी विराजमान झालेल्या बारणे यांचा लोणावळ्यात नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात देखील बारणे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने निवडणुकीत आपले काम केले नसल्याचे बोलून दाखवले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे हे विजयी झाले. महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले संजोग वाघेरे यांचा त्यांनी पराभव केला.

निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपले काम व्यवस्थित केले नसल्याचा आरोप खासदार बारणे यांनी केला होता. त्याला अजित पवार गटाच्या नेत्यांकडून प्रतिउत्तर देखील देण्यात आले होते. मावळचे आमदार आणि अजित पवार गटाचे नेते सुनील शेळके यांनी देखील बारणे यांनी केलेल्या आरोपानंतर त्यांचा समाचार घेतला होता.

Shrirang Barane
Mumbai News: मुंबईत मराठी माणसांसाठी 50 टक्के नवी घरं राखीव? नियम मोडल्यास बिल्डरला...

खासदारपदी निवडून आलेल्या बारणे यांचा लोणावळा शहरात जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी देखील बारणे यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखविली. ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी प्रामाणिकपणे माझं काम केलं.

माझ्यासाठी ते स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण खालच्या कार्यकर्त्यांनी त्यांचेही ऐकलं नाही आणि हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दात खासदार बारणे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. मतदार संघ मोठा असल्याने अनेक भागात मला पोहोचता आलं नाही असेही त्यांनी सांगितले.

मावळ मतदारसंघासाठी आत्तापर्यंत सर्वात अधिक निधी आणला पण त्याचं कधी भांडवल केलं नाही. सतत खोटं सांगितले तर सामान्य माणसाला देखील तेच खरं वाटत. हेच विरोधी पक्षाने आणि माझ्या विरोधातील उमेदवाराने केले.

विरोधी उमेदवाराने त्यांच्या स्वतःच्या प्रभागात आजवर किमान एक तरी काम केलं का? मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो. ही माझी कार्यपद्धती आहे. 'ज्यांनी मतं दिली त्यांची आणि ज्यांनी दिली नाही,' अशा सर्वांचा मी लोकप्रतिनिधी आहे. मी सर्वांची काम करण्यासाठी निवडून आलो असून कोणामध्येही दुजाभाव करणार नाही, असेही खासदार बारणे यांनी सांगितले.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com