Amol Kolhe News: कोल्हेंचा डबल धमाका; सकाळी पाचुंदकरांची घरवापसी, संध्याकाळी देशमुखांचा प्रवेश

Shirur Lok Sabha Constituency 2024: डॉ.अमोल कोल्हे यांचा २४ तासात डबल धमाका केला. अजित पवार राष्ट्रवादीला डबल धक्का बसला. कारण सकाळी दिलीप वळसे-पाटील यांचे विश्वासू सहकारी शेखर पाचुंदकर यांनी घरवापसी केली. म्हणजे ते शरद पवार राष्ट्रवादीत आले.
Mp Amol Kolhe News
Mp Amol Kolhe NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri: भाजपचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि खेड-आळंदी विधानसभेचे निवडणूक प्रमुख अतुल देशमुख यांनी नुकताच (ता.८) पक्षाला राम राम ठोकला. त्याच दिवशी 'सरकारनामा'ने दिलेल्या बातमीत ते शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे म्हटले होते. ते तीन दिवसांत गुरुवारी (ता.११)संध्याकाळी खरे ठऱले.

देशमुख यांनी आपल्या समर्थकांसह शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात तुतारी फुंकली. त्यामुळे या पक्षाचे शिरूरमधील लोकसभेचे (Shirur Lok Sabha Constituency 2024) उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा २४ तासांत डबल धमाका केला. त्यातून अजित पवार राष्ट्रवादीला डबल धक्का बसला.

सकाळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे विश्वासू सहकारी शेखर पाचुंदकर यांनी घरवापसी केली. म्हणजे ते शरद पवार राष्ट्रवादीत आले. त्यांचे शिरूर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील ४२ गावांत मोठे वलय असल्याने त्याचा फायदा कोल्हेंना होणार आहे. त्यानंतर खेड तालुक्यात विशेषत तरुणाईत मोठी क्रेझ असलेले देशमुख यांनी संध्याकाळी शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने कोल्हेंचा डबल धमाका झाला.

Mp Amol Kolhe News
Pooja Tadas News: मोदीजी, मला न्याय द्या; भाजप खासदाराच्या सुनेची विनंती; पूजा तडस यांचे कुटुंबियांवर गंभीर आरोप

खेड -आळंदी विधानसभा मतदारसंघात त्यातही पश्चिम पट्यात देशमुखांची मोठी ताकद आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते भाजपमध्ये नाराज होते.अशातच सध्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत आपले हाडवैरी आणि अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते-पाटील (Dilip Mohite Patil)यांच्या नेतृत्वाखाली त्यांना लोकसभेला काम करावं लागणार होतं. ते न पटल्याने त्यांनी भाजपला रामराम ठोकत हातात तुतारी घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील विधानसभेला त्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. मात्र, काही दिवसांपासून भाजपमध्ये वाट्याला येत असलेला अपमान आणि खेड तालुक्यात सुरू असलेले दडपशाहीचे राजकारण याला वाचा फोडण्यासाठी देशमुख यांनी पक्ष सोडला. खेड तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरंपच, आळंदी, खेड, चाकणचे अनेक माजी नगरसेवक सोबत असल्याचे त्यांनी प्रवेशानंतर सांगितले.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com