शिवसेनेत काय चाललंय, काही नेते नैराश्यात, तर काही कायद्याच्या कचाट्यात

अनिल परब (Anil Parab), प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik), रवींद्र वायकर यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करुन विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं आहे

Uddhav Thackeray Anil Parab Ravindra Vaikar
Uddhav Thackeray Anil Parab Ravindra Vaikarsarkarnama

पुणे : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने शिवसेनेच्या अनेक नेत्यांना डावलण्यात आले. भाजपसोबतची युती तोडल्यामुळे केंद्रात संधी मिळत नसल्याने शिवसेनेचे काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे. तर मुख्ममंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), रश्मी ठाकरे, अनिल परब (Anil Parab), प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करुन विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं आहे. . या पार्श्वभूमीवर शिवसेनेत नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिवसेनेचे नेते अनंत गिते यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसवर काल केलेल्या हल्लाबोलनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसत आहेत. शिवसेनेचे नेते जाहीर कार्यक्रमात आपल्या मनातील नाराजी व्यक्त करीत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना नेते रामदार कदम हेच सरकार पाडण्याचा प्रयत्नात असल्याचा आरोप मनसेने केल्याने अनेक तर्कविर्तक केले जात आहेत.


Uddhav Thackeray Anil Parab Ravindra Vaikar
भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचा निर्धार ; बंगालच्या तालिबानीकरणाविरूद्ध लढणार

शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनीच अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधातील दारुगोळाबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांना माहिती पुरविल्याचा आरोप खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी नुकताच केला. खेडेकर यांच्या या आरोपांवर रामदास कदम म्हणाले की, खेडेकर यांचे आरोप बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आहेत, असं सांगतानाच गेल्या दहा वर्षात मी सोमय्यांचं थोबाडच पाहिलं नसल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे.

अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत. त्याची चौकशी सुर आहे. त्यावर कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. त्यातील एका रिसोर्टचं नाव साई रिसोर्ट अॅनेक्स असं आहे. तर दुसऱ्याचं नाव सी-कॉन्च रिसोर्ट असं असून हा रिसॉर्ट आपल्या मालकीचा असल्याचं लपवण्याचा परब यांचा प्रयत्न आहे. हे दोन्ही रिसोर्ट अनधिकृत असल्याचं केंद्राच्या टीमने राज्य सरकारने सांगितलं होतं. दोन्ही रिसोर्टमध्ये सीआरझेडचा भंग झाला आहे. पण सरकारने केवळ साई रिसोर्ट तोडण्याचा आदेश दिला आहे. दुसरा रिसोर्ट वाचवण्याचं पाप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलं आहे, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

भाजप सोबत शिवसेनेची युती न झाल्याने आपलं पुनर्वसन होऊ शकलं नसल्याची खंत अनंत गीते यांना बोचत असावी. त्यामुळेच त्यांनी काहीही वादविवाद नसताना थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्ला केला. त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली. यावरून शिवसेनेत धुसफूस असल्याचं दिसतं, असं राजकीय विश्लेषकांना मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com