पार्थ पवारांना मुख्यमंत्र्यांनी 'मावळ' द्यावा, बारणेंना राज्यसभेवर पाठवा!

मावळची जागा ही पार्थ यांना देऊन बारणे यांना महाविकास आघाडीने राज्यसभेत पाठवावे.
Maval constituency
Maval constituency sarkarnama
Published on
Updated on

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar)यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी केलेल्या फेसबूक पोस्टवर सध्या चर्चा रंगली आहे.

''पार्थ यांच्या वाढदिवसानिमित्त नितीन देशमुख यांनी एक वेगळी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे. पार्थ पवार यांच्यासाठी शिवसेनेने (Uddhav Thackeray)मावळ मतदारसंघ (Maval constituency) राष्ट्रवादीला द्यावा,'' अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

Maval constituency
शरद पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक ; विमानतळाचा प्रश्न मार्गी लागणार

''महाविकास आघाडीने ठरविल्याप्रमाणे पुढील निवडणूक आघाडी लढणार आहे. त्यामुळे मावळची जागा ही पार्थ अजित पवार यांना देऊन बारणे यांना महाविकास आघाडीने राज्यसभेत पाठवावे. २००५ मध्ये जेव्हा सुप्रीया सुळे या राज्यसभेसाठी उभ्या राहिल्या होत्या, तेव्हा हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेबांनी सुप्रियाताईंना बिनशर्त पाठिंबा दिला होता. आज तोच दिलदारपणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी दाखवावा,'' असे माझ्या सारख्या एका सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाटते,'' असे नितीन देशमुख यांची आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नितीन देशमुख आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणतात..

माझी आणि त्यांची साधारण आठ वर्षांपुर्वीची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात बसल्यानंतर माझा त्यांच्याशी परिचय झाला. १५ ऑगस्टच्या दिवशी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत मुंबईतील मंत्रालय ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत संविधान बचाव रॅली काढली होती. माननीय आव्हाड साहेब आयोजकांपैकी एक होते. याच रॅलीमध्ये पार्थ अजित पवार हातात तिरंगा घेऊन कार्यकर्त्यांच्या मागोमाग चालत होते. रॅलीच्या ठिकाणी मंचावर आदरणीय पवार साहेबांपासून ते अजितदादा, राष्ट्रीय पातळीवरचे मोठे नेते होते. मात्र पार्थ अजित पवार एका सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे त्यांची भाषणं ऐकत होते. तेव्हा मला ते माझ्यातलेच एक तरुण वाटले.

२०१९ साली त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरु केली. पार्थदादा यांना नामोहरण करण्यासाठी जणू भाजपचा आयटी सेल फडणवीस पेक्षाही पार्थदादांवर जास्त नजर ठेवून होता. महाराष्ट्रात आजवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला इतक्या खालच्या पातळीचा प्रचार झाला नव्हता. तो पार्थदादांच्या पराभवासाठी करण्यात आला.

पार्थ पवार मावळच्या निवडणुकीनंतर थांबले नाहीत. पार्थ पवार फाऊंडेशन या संस्थेच्या मार्फत मावळमधील आदिवासी भागात चांगलं काम सुरु आहे. सर्वांचे प्रश्न समजून घेत पार्थ अजित पवार २०१९ पासून प्रसिद्धीच्या झोतात न येता, आपलं काम करत आहेत. पुढील निवडणुकीत याचा प्रत्यय महाराष्ट्राला आल्याखेरीज राहणार नाही.

मला पार्थ अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे करायची आहे. पार्थदादांना एक फेअर चान्स मिळाला पाहिजे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे संसदरत्न खासदार आहेत. त्यांच्या कामाची चुणूक आपण सर्वांनीच पाहिली आहे. महाविकास आघाडीने ठरविल्याप्रमाणे पुढील निवडणूक आघाडी लढणार आहे. त्यामुळे मावळची जागा ही पार्थ यांना देऊन बारणे यांना महाविकास आघाडीने राज्यसभेत पाठवावे. २००५ मध्ये साली जेव्हा सुप्रीयाताई राज्यसभेसाठी उभ्या राहिल्या होत्या, तेव्हा हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेबांनी सुप्रियाताईंना बिनशर्त पाठिंबा दिला होता. आज तोच दिलदारपणा उद्धवजी ठाकरे साहेबांनी दाखवावा, असे माझ्या सारख्या एका सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाटते.

आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणेच पार्थ अजित पवार उच्चशिक्षित आहेत. त्यांचे संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य मी स्वतः पाहिले आहे. इंग्रजी भाषेवर त्यांची उत्तम पकड राज्याचे प्रश्न संसदेत प्रभावीपणे मांडायला मदत करु शकते. ज्याप्रमाणे संसदेत सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, रायगडचे सुनील तटकरे, शिवसेनेचे तरुण खा. धैर्यशील माने आणि इतर सर्व नेते अभ्यासपूर्ण भूमिका मांडतात. त्याप्रमाणेच पार्थ पवार यांच्या सारखा तरुणही महाराष्ट्रातील युवकांचा बुलंद आवाज बनू शकतो, अशी माझी खात्री आहे.

राज्यातील युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पार्थ यांना पुढील लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून संधी द्यावी. तसेच श्रीरंग बारणे साहेबांना सन्मानाने सर्वमताने राज्यसभेची खासदारकी द्यावी. आम्हा तरुण कार्यकर्त्यांची हिच इच्छा आहे .

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com