Union Budget 2025 : 'खडूस’ बाईनं सादर केलेला बजेट; सुरीला मध लावून ती मध्यमवर्गीयांच्या मानेवर फिरवली!

Union Budget 2024 Controvers: निर्मला सीतारामन या ‘खडूस’ बाईने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अद्यापही भक्तांचे टाळ्या वाजवणे संपलेले नाही. जणू काही सामान्य जनता व मध्यमवर्गीयांच्या घरावर सोन्याची कौलेच चढणार आहेत
BJP, Delhi Vidhan Sabaha Election and Union Budget 2025
BJP, Delhi Vidhan Sabaha Election and Union Budget 2025Sarkarnama
Published on
Updated on

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारचा बजेट नुकताच संसदेत सादर केला. या बजेटवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपले मुखपत्र 'सामना'तून सडकून टीका केली आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुका आहेत. त्यांच्यासाठी मोदी-शहांनी आधीच फुकटच्या रेवड्या वाटल्या आहेत, असे अग्रलेखात नमूद केले आहे.

बिहारातदेखील निवडणुका तोंडावर असल्याने पैसा आणि योजनांचा पाऊस बिहारवर पडला. नेहमीप्रमाणे हे बजेट निवडणूकप्रधान आहे. ते काही देशासाठी वगैरे नाही. हे बजेट म्हणे मध्यमवर्गीयांसाठी आहे! सपशेल झूठ, अशा शब्दात सामनातून मोदी सरकारवर कागदी बाण सोडले आहेत.

निर्मला सीतारामन या ‘खडूस’ बाईने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अद्यापही भक्तांचे टाळ्या वाजवणे संपलेले नाही. जणू काही सामान्य जनता व मध्यमवर्गीयांच्या घरावर सोन्याची कौलेच चढणार आहेत अशा पद्धतीचा गाजावाजा सुरू झाला आहे, असे ठाकरे गटानं म्हटलं आहे.

मध्यमवर्गीयांनी मोठ्या प्रमाणात मोदींच्या विरोधात मतदान केले. त्या मतांची चोरी करून भाजपने विजय मिळविला. भाजपच्या विजयाने मध्यमवर्गीय खूश नाही. त्यांना खूश करण्यासाठी 12 लाखांचे उत्पन्न करमुक्त केल्याचा फंडा आणला, पण सुरीला मध लावून ती मध्यमवर्गीयांच्या मानेवर फिरवण्याचाच हा प्रकार आहे. तेव्हा सावधान!असा इशारा दिला आहे.

फुकटच्या रेवड्या

पुन्हा मोदी कृपेने जे सुशिक्षित बेरोजगार पकोडे तळत आहेत त्यांना याचा काहीच लाभ नाही. मग या तुताऱ्या का फुंकल्या जात आहेत? बजेट हे काही असाधारण वगैरे नाही. सामान्य कुवतीच्या महिलेने सामान्य बुद्धिमत्तेच्या सरकारसाठी तयार केलेले राजकीय बजेट आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुका आहेत. त्यांच्यासाठी मोदी-शहांनी आधीच फुकटच्या रेवड्या वाटल्या आहेत. बिहारातदेखील निवडणुका तोंडावर असल्याने पैसा आणि योजनांचा पाऊस बिहारवर पडला.

याला महिला वर्गाचा विकास म्हणायचा?

नेहमीप्रमाणे हे बजेट निवडणूकप्रधान आहे. ते काही देशासाठी वगैरे नाही. हे बजेट म्हणे मध्यमवर्गीयांसाठी आहे! सपशेल झूठ. मोदी सरकारने आधी महिलाकेंद्रित बजेट आणले होते, पण देशातील बहुसंख्य महिला आजही मोफत रेशनच्या रांगेत उभ्या आहेत व गोवा, महाराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेश अशा राज्यांत ‘लाडक्या बहिणीं’ना महिन्याला हजार-पंधराशेचे आमिष दाखवून त्यांना खूश केले जात असेल तर त्यास काय महिला वर्गाचा विकास म्हणायचा?

मोदींचे पोलीस बेरोजगारांवर लाठीमार...

मोदींनी शेतकरीन्मुख बजेट सादर करण्याचा पराक्रम केलाच होता, पण मोदी आल्यापासून शेतकरी शेतमालास किमान भाव मिळावा म्हणून उपोषण व आंदोलन करीत आहे आणि आजही पंजाब-हरयाणात शेतकरी उपोषणाला बसला आहे. मोदींनी रोजगारकेंद्रित बजेट आणले. मोदी वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होते.

प्रत्यक्षात मोदी राज्यात नोकऱ्यांचा दुष्काळ पडला आहे. स्पर्धा परीक्षांचे पेपर बाजारात विकले जात आहेत. बेरोजगार राज्याराज्यांत आंदोलनासाठी रस्त्यांवर उतरला आहे व मोदींचे पोलीस बेरोजगारांवर लाठीमार करीत आहेत. नोकऱ्या नाहीत त्यांनी पकोडे तळावेत असा मोदींचा मंत्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com