Siddharth Shirole: Video लाडक्या बहिणींच्या विश्वासाने भारावलो; प्रत्येक महिलेपर्यंत योजना पोहचवा; आमदार शिरोळेंचे आवाहन

BJP MLA Siddharth Shirole ON ladki bahin yojana: गरजू महिलांसाठी मोलाची ठरणारी ही योजना पोचवण्यासाठी प्रत्येक महिलेने पुढाकार घ्यावा, असेही आवाहन शिरोळे यांनी केले आहे.
BJP MLA Siddharth Shirole ON ladki bahin yojana
BJP MLA Siddharth Shirole ON ladki bahin yojanaSarkarnama
Published on
Updated on

Pune News: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद असून ही योजना प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोचवा," अशी आग्रही मागणी माझ्या मतदारसंघातील भगिनी करताहेत. या योजनेवर त्या दाखवित असलेला विश्वास भारावून टाकणारा आहे," असे शिवाजीनगर विधानसभेचे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. योजनेसंदर्भात बुधवारी काही भगिनींनी शिरोळे यांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती देणारे काही फलक शिवाजीनगर मतदारसंघात लावल्यानंतर त्यातील महिलांचे छायाचित्र वापरण्यावर काहींनी आक्षेप घेतले होते. त्यांच्या भावनांचा विचार करून शिरोळे यांनी ते फलक हटवले.

BJP MLA Siddharth Shirole ON ladki bahin yojana
Vasant More on Muralidhar Mohol: मुरलीअण्णा, तुम्ही दिल्लीला गेलात..पण, आपल्या पुण्याला वालीच राहिला नाही

हे वृत्त समजताच मतदारसंघातील अनेक भगिनींनी शिरोळे यांची भेट घेतली. या योजनेच्या प्रसारासाठी आमची छायाचित्रे वापरा परंतु प्रत्येक पात्र महिलेपर्यंत ही योजना पोचलीच पाहिजे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या या शब्दांनी मी भारावून गेलो, असे शिरोळे यांनी सांगितले. गरजू महिलांसाठी मोलाची ठरणारी ही योजना पोचवण्यासाठी प्रत्येक महिलेने पुढाकार घ्यावा, असेही आवाहन शिरोळे यांनी केले आहे.

31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ

लाडकी बहीण योजनेला सर्वाधिक प्रतिसाद पुणे जिल्ह्यातून मिळताना दिसत आहे. पुण्यातील 2 लाख 75 हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. राज्यभरातील महिलांची गर्दी पाहता आता सरकारनं लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता ज्या-ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज दाखल केला नाही, त्यांना 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com