वळसे पाटील, महेश लांडगे यांचेही फोटो वापरले..तरी आढळरावांच्या मनासारखे झाले नाही...

सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविल्यानंतर राज्यात पहिल्यांदा बैलगाडा शर्यत भरविण्याचा आढळरावांची (Shivajirao Adhalrao Patil) योजना पूर्णत्वास गेली नाही.
Shivajirao Adhalrao 

Shivajirao Adhalrao 

sarkarnama

Published on
Updated on

पुणे : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी लांडेवाडी येथे आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीला दिलेली परवानगी अचानक रद्द केल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. या शर्यतीसाठी आढळरावांनी जोरदार तयारी केली होती. या शर्यतीसाठीच्या माहितीपत्रकावर शिवसेनेच्या नेत्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, भाजपचे आमदार महेश लांडगे यांचेही छायाचित्र त्यांनी घेतले. तरीही आढळरावांच्या शर्यतीत खोडा घालण्यात आला. यामागे राजकारण असल्याची टीका आढळरावांनी केली. पण हे राजकारण कोणी केले, त्यांचे नाव त्यांनी घेतले नाही.

वळसे पाटील, महेश लांडगे, शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे, राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे यांची छायाचित्रे आवर्जून यात वापरली होती. यात महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याचे संकेत दिले होते. भाजपच्या लांडगे यांनीही बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनाही आढळरावांनी श्रेय दिले. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचे छायाचित्र मात्र त्यांनी वापरले नाही. कोठेतरी माशी शिंकली आणि शर्यती रद्द झाल्या. हे शर्यत रद्द होणार असल्याची पूर्वसूचना एका फौजदाराने त्यांना काल (शुक्रवारी) रात्री दिली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कोणी दाद दिली नाही. त्यानंतर रात्री 11.30 च्या सुमारास शर्य़तीला परवानगी नाकारत असल्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. या साऱ्या प्रकाराबद्दल आढळरावांनी नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱयांनी ताळतंत्र सोडत हा निर्णय घेतल्याची टीका केली. ही स्थगिती दिल्याने आयोजक, बैलगाडा मालक, शेतकरी नाराज होत, प्रशासनाच्या विरोधात लांडेवाडीच्या घाटात शनिवारी (ता.१) सकाळी धरणे आंदोलन केले.

<div class="paragraphs"><p>Shivajirao Adhalrao&nbsp;</p></div>
शिवाजीराव आढळराव पाटलांसमोरच महाविकास आघाडीचा निषेध

या वेळी आढळराव यांच्यासमोरच समर्थकांनी महाविकास आघाडी आणि जिल्हा प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.या वेळी आढळराव पाटील म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या भावनांशी जर कोणी खेळत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. साडेसात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर अशाप्रकारे जिल्हा प्रशासनाने रात्रीच्या अंधारात निर्णय जाहीर करणे हे मला कुठे तरी चुकीचे आणि काळे-बेरे वाटले. जिल्हाधिकारांच्या निर्णयांचा आम्ही सन्मानच करतो, पण त्यांनी काहीसा आधी हा निर्णय जाहीर करायला हवा होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने संध्याकाळी ६ वाजता फोन करून उपाययोजनांचा अहवाल पाठवायला सांगितला. त्यानंतर या अहवालावर समाधान व्यक्त करत चांगल्या उपाययोजना असल्याचे सांगितले. मात्र रात्री ८ वाजता पोलिसांनी येऊन सांगितले, की कदाचित तुम्हाला बैलगाडा शर्यती स्थगित करायला लागेल आणि त्यानंतर ११ वाजता जिल्हाधिकारी आदेश काढतात, हे कुठेतरी चुकीचे आहे. या निर्णयामागे राजकारण आहे.’’

<div class="paragraphs"><p>Shivajirao Adhalrao&nbsp;</p></div>
शिवाजीराव आढळराव पाटलांसमोरच महाविकास आघाडीचा निषेध,पाहा व्हिडिओ

लांडेवाडीत आढळरावांच्या नेतृत्वातच महाराष्ट्रातील सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत पार पडणार होती. पण ही गोष्ट काही लोकांना पटली नाही, त्यांच्या डोळ्यात खुपत होती, त्यामुळेच ही शर्यत बंद पाडण्यात आली, असा आरोपही त्यांनी नाव न घेता केला. पण हे कोणी केले, याचे नाव त्यांनी जाहीर केले नाही.

छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान
शर्यतींमुळे लांडेवाडी गावात आणि बैलगाडा घाट परिसरात हलवाई, कुल्फी, खेळणी, केळी विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसियाकांनी शुक्रवारी (ता.३१) दुपारपासूनच दुकाने थाटली होती. यासाठी हात उसणे पैसे घेतले होते. बैलगाडा शर्यत रद्द झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com