Pune Politics News : "आढळरावांनी लोकसभेचा दावा सोडला की काय?"

Sachin Ahir on Shivajirao Adhalrao Patil : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर ठाकरे गटाचा निशाणा...
Shivajirao Adhalrao Patil
Shivajirao Adhalrao PatilSarkarnama

Shivajirao Adhalrao Patil Latest News Pune :

सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव यांना म्हाडाचे पुणे विभागाचे अध्यक्षपद मिळाले आहे. त्यांच्या पात्रतेनुसार (अनुभवानुसार ) त्यांना पद मिळाले नाही. कमी उंचीचे पद घेऊन त्यांनी लोकसभेचा दावा सोडला की काय ? असा खोचक सवाल माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी केला आहे.

शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त अहिर खेड तालुक्यात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी Uddhav Thackeray गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक खांडेभराड, शिवाजी वर्पे, तालुकाध्यक्ष रामदास धनवटे, माजी सभापती अमोलदादा पवार, बाजार समिती संचालक सोमनाथ मुंगसे, सागर मुऱ्हे, सुरेश भोर, मंगेश पऱ्हाड, युवा सेनेचे राज्य विस्तारक विशाल ससाणे आदी उपस्थित होते.

Shivajirao Adhalrao Patil
Loksabha Election 2024 : 'म्हाडा दिले म्हणून गप्प बसणार नाही...'; आढळराव पाटलांचा लोकसभा लढण्याचा पक्का बेत

'आढळरावांनी एवढ्यात समाधान का मानले ? असा सवाल करीत ते आमच्याकडे असते तर, त्यांना विचारून कार्यकर्त्यांना पदे दिली असती. त्यांनी हे पद स्वतःला न घेता त्यांचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर, नितीन गोरे, सचिन बांगर यांच्यासाठी सुचविले असते तर, बरे वाटले असते. हे पद त्यांनी स्वतःला घेऊन लोकसभेचा दावा सोडला की काय ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला असेल', असा टोला सचिन अहिर यांनी लगावला.

खेड, जुन्नर विधानसभा आम्ही लढविणार असून त्यासाठी आमच्या नेतृत्वाकडे खेडची जागा मागणार आहे. आढळराव आमच्याकडे उपनेते होते. तिकडे नेते झाले, तरीही त्यांना हे पद दिले आहे. नेत्यांना हे पद शोभत नाही, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आढळराव आणि गोरे कुटुंबातील काही सदस्य सुद्धा निवडणुकीत जागा मिळणार नाही, या उद्देशाने पक्षाबाहेर गेले आहेत. विधानसभेसाठी आमच्याकडे इच्छुक खूप आहेत. अजून आमच्याकडे बरेच पक्ष प्रवेश होणार आहेत. त्यात विविध गावचे सरपंच, पदाधिकारी यांचा समावेश आहे, असे अहिर म्हणाले.

ज्यांना लोकसभा लढवायची त्यांनी हे पद घ्यायला नको होते. त्यांना अजून चार पदे मिळाली तरी ती पदे ते घेतील. असले पद त्यांना देऊन त्यांची बोळवण केली आहे, असे जिल्हाध्यक्ष अशोक खांडेभराड यावेळी म्हणाले.

edited by sachin fulpagare

Shivajirao Adhalrao Patil
Shivajirao Adhalrao Patil : लोकसभेच्या तोंडावर शिवाजीराव आढळराव पाटलांकडे नवी जबाबदारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com