Shivajirao Adhalrao Patil : लोकसभेच्या तोंडावर शिवाजीराव आढळराव पाटलांकडे नवी जबाबदारी

Eknath Shinde, MHADA : शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटलांच्या समर्थकांचा जल्लोष
Shivajirao Adhalrao Patil
Shivajirao Adhalrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम काही दिवसांनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे नवी जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य शासनाने त्यांची पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आढळराव पाटलांच्या कामकाजाची व जनसंपर्काची दखल घेऊन त्यांची म्हाडा अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आढळराव पाटील यांची निवड झाली आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी गृहनिर्माण विभागाचे सचिव अजित कवडे यांनी पारित केले. याबाबत माहिती समजताच शिरूर लोकसभा मतदारसंघात जल्लोष केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivajirao Adhalrao Patil
Rajya Sabha Election 2024 Update : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध; चव्हाण,पटेल, देवरा,हंडोरे यांच्यासह सहाही जणांना खासदारकी

याबाबत शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी गरजू लोकांना घरे देणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माझ्यावर म्हाडा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवलेली आहे. ती मी समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. या पदाच्या माध्यमातून मध्यमवर्गीय गरजूंना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात गृहनिर्माण संस्थेच्या (MHADA) माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना फायदा करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही आढळराव पाटील म्हणाले.

आता कधीही लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे. शिरूर लोकसभा (Shirur) मतदारसंघातून आढळराव पाटील शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक आहेत. येथे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे खासदार आहेत. आढळराव पाटलांना सध्या बदललेल्या राजकीय स्थितीचा फायदा होण्याचा विश्वास आहे. त्यातच आता मुख्यमंत्री शिंदेंनी म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड केल्याने आढळराव पाटलांना आत्मविश्वास दुणावला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Shivajirao Adhalrao Patil
Nashik Lok Sabha Election : भाजप स्वकीय इच्छुकांसह विरोधकांनाही देणार ‘शॉक’! नाशिकमध्ये काय आहे प्लॅन?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com