Pune Crime News: धक्कादायक! पुण्यात तरुणीवर प्राणघातक हल्ला

Pune Attack On MPSC Student: या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.
Crime News
Crime News Sarkarnama
Published on
Updated on

Sadashiv Peth - Pune: राज्यात सहावी आलेली दर्शना पवारच्या हत्येची घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर एका तरुणाने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणी आज सकाळी कॉलेजला निघाली होती. यावेळी तरुणीसोबत तिचा दुसरा मित्रही होता. सदाशिव पेठेतून जात असताना तरुण त्यांच्या मागून आला आणि अचानक तिच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी तरुणाने , तरुणानं तिच्यावर कोयत्यानं हल्ला केल्याने ती जखमी झाली. जीव मुठीत घेऊन पळत सुटली. तिचा मित्रही कोयता घेऊन तिच्या मागे पळत होता. ती मदत मागत होती. पण तिच्या मदतीसाठी कुणीही पुढे आलं नाही.  (Pune Crime)

Crime News
Darshana Pawar Death Case : दर्शनाच्या खूनानंतर आरोपी राहुल हंडोरेने 'अशी' केली पोलिसांची दिशाभूल; तपासात झाला 'प्लॅन' उघड

पण ती पळत असताना एक तरुण तिच्या मदतीसाठी धावून आला. कोयता हातात असलेला तरुण तरुणीच्या डोक्यावर वार करणार एवढ्यात मदतीसाठी धावून आलेल्या तरुणाने त्याचा कोयता धरला त्याला रोखलं. यानंतर इतर लोक पुढे सरसावले आणि हल्लेखोराला चोप दिला. उपस्थितांनी या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेतलं. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. (Crime News)

लेशपाल जवळगे असे तरुणीला वाचवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. लेशपाल सोलापूर जिल्ह्यातील असून तोही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यासिकेत निघाला होता. रस्त्यात त्याला एक तरुणी पळताना दिसली. त्याने हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर तो तरुणीचा जीव वाचवण्यासाठी धावला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com